![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक
देवरी प्रतिनिधी/ देवरी नागरिक पतसंस्थेत उपोषणकर्ते नित्य निधी संग्राहक म्हणून काम करीत होते. देवरी तालुक्यातील नागरिकांनी उपोषणकर्त्यावर विश्वास ठेवून करोडो रुपयांचा निधी जमा केला. मात्र देवरी नागरिक पतसंस्थेचे व्यवस्थापक, अध्यक्ष व संचालक मंडळांनी संस्थेतील करोडो रुपयांच्या निधीचा घोळ करून अफरातफर केली असल्याने तालुक्यातील ठेवीदारांना अद्याप रक्कम न मिळाल्याने नित्य निधी संग्राहकाना आमरण उपोषणाची वेळ आली आहे. जोपर्यंत ठेवीदारांचे पुर्ण रक्कम मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा ठाम पवित्रा घेतला आहे.
गुरुवार (दि.१५) पासून उपोषणकर्त्यानी सहकारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज सहा दिवसांचा कालावधी लोटूनही लक्ष दिला जात नाही. त्यांची प्रकृती आज चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपोषणकर्त्याची दखल घेतली जात नाही आहे. नित्य निधी संग्राहकानी ठेवीदारांची रक्कम गोळा करून देवरी नागरिक पतसंस्थेत जमा केले. ठेवीदारांची रक्कम व्यवस्थापक व संचालक मंडळांनी घशात घातल्याने नित्य निधी संग्राहकाना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मानसिक त्रासापायी कित्येक संग्राहकाचा कुटुंब उद्ध्वस्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा
देवरी नागरिक पतसंस्थेत कित्येक नागरिक नित्य निधी संग्राहक म्हणून काम करीत होते. दारोदारी फिरून ठेवीदार तयार करून संस्थेत करोडो रुपयांचा निधी जमा केला. आज त्यांच्या दारापर्यंत मरण येवून ठेपला आहे. उपोषणकर्त्यानी १५ तारखेपासून आमरण उपोषण करीत आहेत. आज त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली नाही. या उपोषणाला आज मंगळवार (दि.२०) ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम, तालुकाध्यक्ष विलास चाकाटे, तालुका महिला अध्यक्ष आरती जागळे, दिलीप जुळा जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा महासचिव बिसराम सलामे, जिल्हा सचिव महेंद्र निकोडे, देवेंद्र शहारे, अरुण आचले तालुका युवक अध्यक्ष, दिनेश वैद्ये उपोषण स्थळी दाखल होऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.