![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लखानी पतिनिधि लाखनीला/ खनी येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 8 दिवसात काम पूर्ण करण्याचे निर्देश..
८ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पाच गावातील धान उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाकांक्षी झाशीनगर उपसा सिंचन योजना टप्पा-१ अंतर्गत उन्हाळी पिकांचा लाभ देण्यासाठी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाच गावांना सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या आहेत.माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी उपविभागीय अधिकारी श्री.सहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, उपसा पाटबंधारे कार्यकारी अभियंता श्री.पाटील, लघु पाटबंधारे अभियंता समीर बनसोडे यांची आज दि.1 मार्च रोजी लाखनी येथे घेतली.
बैठकीत डॉ.फुके यांनी झाशीनगर उपसा सिंचन योजनेच्या टप्पा-१ अंतर्गत ८ मार्च महाशिवरात्रीपर्यंत पाच गावांमध्ये जलसिंचनाची व्यवस्था युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या. 8 मार्च रोजी नवेगावबांध धरणावर माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव, देवलगाव, येरंडी, मुंगली, खोली या पाच गावांना याचा फायदा होणार आहे.
डॉ.फुके म्हणाले, या पाच गावांना उन्हाळी सिंचनाचा लाभ देण्याबरोबरच आगामी खरीप हंगामात सुमारे २७ गावांतील शेतकऱ्यांना झाशीनगर उपसा सिंचन योजनेचा लाभ मिळणार आहे.
चौकट मध्ये——–
दिल्लीला जाऊन झाशीनगर टप्पा-2 च्या फॉरेस्ट येथे प्रलंबित कामांना गती देणार..
या बैठकीत माजी पालकमंत्री डॉ.फुके यांनी झाशीनगर टप्पा-2 येथील फॉरेस्ट येथील रखडलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी डीएफओ मोहन पंचभाई, सीसीएफ महेश गुप्ता आणि इतर वन अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून या प्रकरणाची दखल घेतली. 4 हजार 225 हेक्टर जमिनीला सिंचन देणारी ही उपसा सिंचन योजना अद्यापही अपूर्ण असल्याने अनेक गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. वनक्षेत्रात वारंवार बदल केल्याने झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम रखडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रामपुरी, चुटिया, तिडका, बसबोडन, झाशी नगर, धाबेपवनी, धाबे टेकडी, येरंडी ही गावे अजूनही सिंचनापासून वंचित आहेत.
जंगलातील प्रकल्पाचे काम राखीव वन, एमपीडब्ल्यू आणि नवेगाव-नागझिरा आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केल्यामुळे वनक्षेत्राकडे पाठवलेला प्रस्ताव मान्य होऊ शकला नाही. जंगलात जाण्यापूर्वी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या सर्वांच्या संयुक्त प्रस्तावासाठी एफआरए प्रमाणपत्र केएमएल फाइल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्ली वन मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे.
माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून नागपूर वनविभाग कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आणि या प्रस्तावाबाबत त्यांनी स्वतः दिल्ली वन मंत्रालयाकडे जाऊन येत्या दोन वर्षात येणारे अडथळे दूर करण्यास संमती दर्शवली.