![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा:- तिरोडा ते घाटकुरोडा रस्ता अत्यंत खराब झालेला असून या रस्त्यावर रेतीघाट असल्यामुळे मोठया प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत होती परिणामी सालेबर्डी मांडवी, घोगरा चांदोरी बूज.व घाटकुरोडा येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत असे सदर रस्त्याबाबत नागरिकांची प्रंचड मागणी होत होती याची दखल घेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत १०.८४ कि.मी.रस्त्याकरिता ५ वर्षे देखभालासहित २९३३.७९ लक्ष रुपये मंजूर शासनाकडून मंजूर करवून घेतले याद्वारे घाटकुरोडा येथे १.६०० कि.मी गावअंतर्गत सिमेंट रस्ता,घोगरा येथे गावांतर्गत ०.६०० मि.सिमेंट रस्ता बांधकाम होणार असून सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले,उपसभापती भूमेश्वर रहांगडाले, हुपराज जमाईवार, संचालक रविंद्र वहिले, जी.प.सदस्य किरण पारधी, पवन पटले, प.स.सदस्य वनिता भांडारकर, प्रभा राउत सरपंच ग्रा.प.घाटकुरोडा,प्रिती भांडारकर सरपंच ग्रा.प.घोगरा,जयसिंग उपासे, सरपंच ग्रा.प.चांदोरी खुर्द, मोहारे सरपंच, ग्रा.प.बिरोली/सोनोली, महेश लिल्हारे सरपंच ग्रा.भंबोडी,विनोद लिल्हारे सरपंच ग्रा.प.सालेबर्डी मा.सरपंच प्रकाश भोंगाडे,राजेश डोंगरे,डॉ.रामप्रकाश पटले,उपस्थित होते.