![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हेडलाईन उपसंपादक/ मुनीश्वर मलेवार
प्रतिनिधी/ लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झालेली असून बहुतांश पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज ही दाखल केले असून लोकसभेचे उमेदवारांनी आपल्या मतदार पर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मीडिया च वापरावर भर पाडली आहे सोशल मीडिया चे माध्यमातून हायटेक प्रचारावर भर पडल्याचे चित्र प्रत्येकानं मोबाईल वर पाहावयास मिळत आहे पूर्वी प्रचाराचे वाहन प्रत्येक ठिकाणी बिल्ले पत्रक वाटप व्हायचे परंतु आता
सोशल मीडिया चे प्लॅटफॉर्म अधिकच प्रभावी झाल्याने प्रचाराची रणधुमाळी सद्या सोशल मीडिया माध्यमातून उमेदवारांनी गाजवलेली आहे भासने, रैली, कार्यकर्त्यांचा संख्या बळ क्षेत्रातील मुद्दे,वचननामा असे अनेक आश्वासने मतदारापर्यंत चित्रफीत माध्यमातून पोहचविले जात आहे मतदारांना उमेदवारांचा प्रचार प्रसार क्षेत्रातील मतदारां पर्यन्त वेगाने पोहचन्यासाठी अनेक शोसल मीडिया वर अनेक चित्रफीत तयार करण्यात आले तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी इंटरनेट सोशल मीडिया वर आकर्षक प्रचार प्रसार गाजवला आहे
लोकसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनते पर्यंत तसेच मतदारांना उमेदवार कळावा या साठी इंटरनेट मोबाईल चे माध्यमातून उमेदवारांच्या प्रचाराची चांगलीच स्पर्धा लागली आहे मतदारचा कल आपल्याकडे वळले पाहिजे या हेतूने उमेदवारांनी आपल्या प्रचाराचे अनेक व्हिडिओ क्लिप तसेच केलेल्या कार्या विषयी अनेक व्हिडिओ प्रसारित केलेले आहे आज उमेदवार प्रतेक्ष मतदारांच्या घरापर्यंत उमेदवार पोहचू शकत नसल्याने सर्वसामान्य जनतेपर्यंत उमेदवार आपली ओळख सोशल मीडिया चे माध्यमातून करून घेत आहे प्रचारासाठी सोशल मीडिया चे वापर उमेदवारांना मतदान मिळण्यासाठी सोयीचे वाटू लागलेले आहे