![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा प्रतिनिधि/ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा समन्वयक, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्षा, शहर अध्यक्ष यांसर्वांची बैठक पूर्व विदर्भातील विदर्भ निर्माण महामंचच्या व त्यातील घटक पक्षाच्या पाचही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी बोलावण्यात आली होती या बैठकीचे अध्यक्षस्थानी जेष्ठ अर्थतज्ञ व तज्ञ कोर कमेटी सदस्य डॉ. श्रीनिवास खांदेवाले हे होते. सर्व जिल्ह्यातील कोर कमेटी सदस्य व जिल्हाध्यक्षांनी आपआपली मते मांडली व शेवटी एकमताने विदर्भ निर्माण महामंचच्या उमेदवारांना व जेष्ठ विदर्भवाद्यांना पाठिंबा देण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. सर्वांच्या मते लढवैय्ये विदर्भवादी विदर्भ राज्य मिळविण्याकरिता संसदेत पाठवणे ही काळाची गरज आहे हि भूमिका स्पष्टपणे व्यक्त करण्यात आली.
या बैठकीत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून जय विदर्भ पार्टीचे अधिकृत उमेदवार अशोक राठोड यांना तर रामटेक राखीव लोकसभा मतदार संघातून भोजराज सरोदे या जय विदर्भ पार्टीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच, नागपूर लोकसभा मतदार संघातून विदर्भ निर्माण महामंचचा घटक असलेल्या कुणबी बहुजन स्वराज्य पार्टीचे अधिकृत उमेदवार असलेल्या सुरज मिश्रा यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. शिवाय, वर्धा लोकसभा मतदार संघातून विदर्भ निर्माण महामंचचे घटक असलेल्या विदर्भ राज्य आघाडी चे अधिकृत उमेदवार आशिष इझनकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. याशिवाय, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार दैनिक कशिश चे संपादक तथा जेष्ठ विदर्भवादी नेते एड. वीरेंद्र जैस्वाल यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
या बैठकीला विराआंसचे अध्यक्ष तथा माजी आमदार एड. वामनराव चटप, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे, विराआंस चे पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, को.क.सदस्य डॉ. रमेशकुमार गजबे, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, डॉ. दिलीप झळके पाटील, सुरेंद्र वाढई, नरेश निमजे, गुलाबराव धांडे, भारतीय मुस्लीम परिषदचे जावेद पाशा, एड. सुरेश वानखेडे, कुणबी बहुजन स्वराज्य पार्टीचे दत्तात्रय ठाकरे, एड. मृणाल मोरे, सुधा पावडे, नीलिमा सेलुकार, राजेंद्र आगरकर, कृष्णराव भोंगाडे, राजेंद्र सिंह ठाकूर, राजकुमार शेंडे, नसीर जुम्मन शेख, कपिल इद्दे, रमेश नळे, रविकांत अढाऊ महाराज, प्रा. राम बारोटे, गोविंद चव्हाण, मधुसूदन कोवे, सुनील पाटील साबळे, घीसू पाटील खुणे, मुत्ताजी दुर्गे, गणेश शर्मा, रवींद्र भामोडे, ओमप्रकाश शाहू, प्रदीप देशपांडे, अरविंद भोसले, प्रशांत जयकुमार, संजय चौधरी, महेंद्र सातपुते, रत्नाकर जगताप यांसह अन्य पदाधिकारी व नेते उपस्थित होते.