![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर: तुमसर येथे एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता खूप वाढलेली असते. उन्हाळ्यात हा पारा 40 ते 44 डिग्री सेल्सीयसच्या आसपास असतो. उन्हाळ्यामध्ये लग्नसराई किंवा धार्मीक कार्यक्रम जास्त असल्यामुळे बहुतांश लोक हे प्रवास करतात.
सर्वसामान्य नागरीक देखील खेरेदीसाठी बाजारात आलेले असतात व उन्हा मुळे त्यांचें हाल होत असतात याची दखल घेत राजमुद्रा ग्रुप तुमसर तर्फे दि:-४ मार्च २०२४ ला ऑटो स्टँड,पोलीस स्टेशन जवळ धर्मार्थ पाणी प्याऊ चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राजमुद्रा ग्रुप महिला मंडळाचे मीरा भट,मीनल नीमजे, राजमुद्रा ग्रुप संस्थापक/अध्यक्ष इंजि.सागर गभने, सागर भुरे, शुभम बाणासुरे,राहुल रनदिवे,योगेश आजापुजे,अनुप तिडके,बापु बडवाईक,स्वप्निल डुंबरे,अर्पित खणोर्कर उपस्थित होते.