
प्रतिनिधि/ मुनीश्वर मलेवार
भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस जिल्ह्यात आणि तुमसर मोहाडी तालुक्यात सर्वत्र लागून पडल्याने तो आता जाण्याचा नाव घेतना दिसत नाही त्यामुळे जे काही शेतामधील पीक शेतकऱ्यांचा हातात वाचली होती तेही शेती पिके उद्ध्वस्त होण्याचं मार्गावर आली आहेत त्यामुळे शेत पिकांच्या नुकसानीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार यात आता शंका राहिली नाही. अवकाळी पाऊस हा मागे लागल्यासारखं झालेला आहे शेतकऱ्यांच्या हातचे पीक आता पूर्णतः उद्ध्वस्त होण्याचं मार्गावर आहे अवकाळी वादळी पावसाने तालुक्यात दहशत निर्माण केले आहे,होणाऱ्या हवामान बदलाच्या या परिणामाने अनेक समस्या ग्रस्त चे चित्र दिसून येतील
मोहाडी तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग शेतीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे आलेला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर आर्थिक नुकसानीचा फटका चांगलाच बसला आहे सद्या शेतकऱ्यांचा शेतात उन्हाळी धान,भाजीपाला,फळबाग असे पीक घेतले जात आहे परंतु ते पीक आता अवकाळी पावसाच्या घशात गेल्यासारखे झाले आहे . शेतकऱ्यांचे शेतावरील पिकांचे पंचनामे होतील तरी पण आर्थिक अडचणी कमी होणार नाही अवकाळी पावसाने पिकांन सोबतच परिसरात घराचे नुकसान, पशू प्राण्याचे सुधा नुकसान केले आहे त्यामुळे आता नुकसान भरपाई ची प्रतिक्षाच करावी लागणार आहे नुकसान भरपाई कधी मिळेल असा प्रश्न शेतकरयांना आणि नुकसानग्रस्त सामान्य नागरिकांना पडलेला आहे
शासनाचे अनेक पंचनामे होऊन सुध्धा शासकीय कार्यालयात थांबून असतात झालेल्या नुकसानीचे आर्थिक भरपाई मिळण्यासाठी प्रतीक्ष करावी लागणार आहे नैसर्गिक आपत्ती चे वेळी शासनाकडून धावून मदत होण्यास दिरंगाई होत असते त्यामुळे शासकीय यंत्रणा संकटात आलेल्यांना मदत पुरविण्यात नेहमी विलंबच करीत असते.





Total Users : 883186
Total views : 6488654
