![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
मुनीश्वर मलेवार/ तुमसर/मोहाडी
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बु येथे प्रसिद्ध असलेला बैल बाजार आणि आठवडी बाजार नियमित बुधवार ला भरत असतो बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहक लोकांची रेल चेल असते या बाजारात मोठ्या संख्येने व्यापारी ग्राहक येत असतात हा आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गावर टि पॉइंट बाजार चौकात लगतच्या मैदानात भरत असून बाजारात येणारे शेकडो दू चाकी वाहन रस्त्यावरच ठेवले जात असते व माल वाहक वाहने सुद्धा रस्त्यालगत लावले जात असल्याने या रस्त्यावरून चालणारी इतर इतर वाहनांना या रस्त्यावरून निघण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते या ठिकाणी रस्त्यावरच वाहनाची गर्दी कोंबून जात असल्याने त्यामुळे इतर ये जा करणारी वाहनांना मोठ्या अडचणी च सामना करावा लागतं असतो रस्त्यावरच उभे असलेल्या वाहणाकदे पोलीस विभागाचे आणि ग्रामपंचायतीचे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही बाजारात येणारे वाहने नियमबाह्य रस्त्यावरच ठेवले जात असल्यानं या ठिकाणी वाहने ठेवण्यासाठी कोणतीही दखल घेतली जात नाही या रस्तावर वाहतूक पोलीस असून सुध्धा अवैध रस्त्यावर उभे असलेल्या वाहानकदे दुर्लक्ष होत असून बाहेरून बैल बाजारात खरेदी विक्री करिता येणारे वाहणाकडेच जास्ती लक्ष दिले जात असते त्यामुळे रस्त्यावरच ठेवलेली वाहनाकडे दुर्लक्ष केले जात आहे ग्रामपंचायत ला बाजारातून मोठी वसुली मिळत असली तरी आवश्यक असलेल्या सुविधा कडे सुद्धा दुर्लक्ष केले जात असते असे या ठिकाणी चित्र दिसून येते बाजारात येणारे वाहणकरिता नियोजित जागा उपलब्ध असली तरी या ठिकाणी वाहन ठेवण्यात वाहनधारकांना अडचणी येत असतात त्यामुळेच वाहनधारक रस्त्यावरच आप आपली वाहने ठेवत असतात या करिता पार्किंग स्थानावर वाहने लागली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली जात नसल्याने हा देव्हाडा टी पॉइंट रस्ता धोक्याचा झालं आहे येथे असलेल्या बाजार चौक मोठा अपघात होण्याला आमंत्रण देत आहे यात शंका नाही