![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ मुनीश्वर मलेवार
तुमसर/मोहाडी तालुक्यात अंगणवाडी द्वारे लहान बाळांना मिळणारे पोषण आहार दिवसेंदिवस निकृष्ट दर्जाची वाटप करिता येत असून प्रशासन पुरवठा विभाग या कडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे पोषण आहार हा बाळांना त्यांचं योग्य वयात पोषण मिळण्यासाठी शासनाकडून पोषण आहार किट वाटप केले जात असतो.पोषण आहारात विविध प्रकारचे पोषण देणारे धान्य कडधान्य वितरीत केले जाते परंतु शासनाचे लेबल लावलेलाच पोषण आहार आता अतिशय निकृष्ट दर्जाची येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.बाळांना मिळत असलेले विविध प्रकारचे पोषण आहार काही एक्सपायरी झाली आहेत तर काही धान्य निकृष्ट दर्जाची येत असल्याने बहुतांश लहान मुले खात नसल्याचे तक्रार पालक वर्ग अंगणवाडी ला करीत आहेत परंतु वाटप करणरी अंगणवाडी सेविका कर्मचारी सुध्धा नाहिलाजने शासनाकडून येत असलेल पोषण आहार निकृष्ट दर्जाचे असल्याचे जाणीव असून सुध्धा प्रशासनाच्या आदेशानुसार वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहेत सद्याचा पोषण आहार धान्य मिळवले असून कीचदी प्रकार करण्यासाठी दिले जात असून पॉकेट मधील सगळे धान्य निकृष्ट असल्याने बाळांना पोषण आहार अपायकारक झालं आहे यात वेळीच सुधारणा करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे