![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ मुनीश्वर मलेवार
तुमसर गोंदिया महामार्ग आणि देव्हाडा साकोली मार्ग मुख्य टी पॉइंट असल्याने मागील वर्षापासून रस्ते बांधकाम विभागातून हायमास्थ लाईट लावण्यात आले परंतु दिलेले सुविधा कडे बांधकाम विभातून सर्रास दुर्लक्ष केले गेले आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना अनेक अडचणी च सामना या टी पॉइंट चौकात होत असल्याने हायमास्थ लाईट चे खांब लावण्यात आले परंतु आजही हायमास्थ खांब लावून सुध्धा दिव्याखाली अंधार अशी स्थिती आहे सदर हायमास्थ खांब उभे असलेला ठिकाणी चौ रस्ता असून ग्रामस्थांची सतत ये जा असते प्रवासी निवारा या रस्तावर अजूनही बनविण्यात आले नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून वाहनांची वाट पाहावी लागत असते देव्हाडा गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथील टी पॉइंट चौकात पथदिवे लावलेलं असूनही अंधारात असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हाय मास्त खांबवर दिवे बसवले असून सुध्धा वर्ष भरापासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना अंधाराचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे वारंवार संबंधित विभागाला सूचना करून सुध्धा रस्ते बांधकाम विभागाचे वतीने कोणतीही कार्यवाही करण्यात आले नाही त्यामुळे बंद अवस्थेत उभे असलेले हायमास्थ दिवे त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी देव्हाडा बु उपसरपंच भाऊराव लाडे यांनी केली आहे