



इंडियन हैडलाइन न्यूज़/भंडारा प्रतिनिधि
योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी भंडारा, मा.मिलिंद सोमकुंवर DHO यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार आदिवासी विकास मंंत्रालय नई दिल्ली च्या सुचनेनुसार,,,,
इंडियन रेडक्रॉस सोसायटी भंडारा व जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा चे संयुक्त विद्यमाने दि.१९/६/२४ ते ३/७/२४ पर्यंत “सिकलसेल पंधरवाडा” डॉ.नितीन तुरस्कर मानद सचिव रेडक्राॅस भंडारा यांचे पुढाकारानी दि.२९/६ रोजी मोहदूरा ग्राम पंचायत, हत्तीडोई ग्राम पंचायत,दि..३०/६ रोजी सावरी ग्राम पंचायत,दि.२/७/२४ रोजी खोकरला समाज भवन, दि.३/७/२४ रोजी केसलवाडा.ता.जि.भंडारा,दि.४/७/२४ रोजी खमारी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिवनज्योती थॅलेसेमिया व सिकलसेल संस्था भंडारा यांचे सहभागातून साजरा करण्यात आला.
सिकलसेल जनजागृती अभियान पंधरवाडयात डॉ.नितीन तुरस्कर सचिव यांचे सिकलसेल तत्वज्ञान, डॉ.चंद्रमोहन गुप्ता उपाध्यक्ष यांचे रेडक्राॅसच्या कार्याबद्दल, रविशंकर साकोरे सचिव जिवनज्योती यांचे थॅलेसेमीया बाबद, प्रितमकुमार राजाभोज रक्तदूत यांचे रक्तदान महादान बाबद, राजू भाऊ खवसकर साहित्यिक यांचे “बेटीचा मान, नारीचा सन्मान” बाबद मार्गदर्शन झाले.
यात रेडक्राॅसचे सदस्या, समाजसेविका सौ. श्वेता शिंगाडे , सौ.पदमा खवसकर, सौ.नम्रता बागडे समाजसेविका, सौ.सिमाताई भोंदे सरपंच मोहदूरा, सौ.ज्योतीताई लांजेवार. सरपंच हत्तीडोई, गिरीश ठवकर सरपंच सावरी, गजानन पडोळे पोलिस पाटील हत्तीडोई, जेष्ठ नागरिक वासुदेव निर्वाण, आशा वर्कर सौ.संध्या लिचडे, सौ.राखी बसेशंकर, सौ.कुसूम धुर्वे, सौ.कविता गजभिये, पुरुषोत्तम गुल्लानी, दवेशकुमार वसानी,,PHc मोहदूरा ,डी.के.बंसोड मॅडम यांनी सहकार्य केले.
रेडक्राॅस सोसायटी महाराष्ट्र प्रदेश च्या आमसभेत मा.राज्यपाल रमेशजी बैस साहेब यांचे उपस्थितीत “बेटीचा मान,नारीचा सन्मान” अभियाना अंतर्गत राजू खवसकर यांचे पुढाकारातून मोहदूरा, हत्तीडोई व सावरी येथील (५०)महिलांचा पुष्पकळीने सामुहिक सत्कार करण्यात आला. सिकलसेल व थॅलेसेमीया बाबद जनजागृती अभियानास नागरिकांनी विशेष महत्त्व दिले. संचालन राजू खवसकर व आभार सौ.श्वेता शिंगाडे यांनी केले.
प्रत्येक व्यक्ति ने सिकलसेल ची रक्त तपासनी सामान्य रुग्णालय भंडारा यथे जाऊन करावी असे आवाहन समाजसेवी प्रितमकुमार राजाभोज यांनी केली आहे.