इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर मोहाडी विधानसभेतील जनसामान्यांच्या₹ सुदृठ आरोग्यासाठी, रोगाचे योग्य निदान करण्यासाठी निशुल्क महारोग्य व रोगनिदान शिबिराचे आयोजन आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे याची शुरूवात १ ऑगस्ट 2024 ला सकाळी १० ते २ ला मोहाडी येथील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ येथे होणार आहे. हे शिबीर तुमसर/मोहाडी विधानसभा क्षेत्रात ३२ राबविले जाणार असून गुरुवार दिनांक 1ऑगस्ट 2024 ते दिनांक 14 ऑक्टोबर 2024* पर्यंत आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये चष्मे व औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याने निशुल्क देण्यात येणार असून या महारोग्य व रोग निदान शिबिरामध्ये नागपूर येथील MBBS, MD अशे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
या महारोग्य शिबिरामध्ये ECG चेकप,नेत्ररोग:-ज्यामध्ये डोळ्यांचे सर्व आजार मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी.
*मेडिसिन*:- ररक्तदा,ब्लड शुगर, बरेच दिवसाच् ताप, किडनीचे आजार, हृदयरोग अशक्तपणा,वारंवार चक्कर येणे.
*सर्जरी*:-हायड्रोसिल,हर्निया, अंगावरील गाठी,आतड्याचे आजार, पोटाचे आजार,थायरॉईड इत्यादी.
*स्त्रीरोग*:-मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांना होणारे इतर आजार.
*बालरोग*:- हृदयाला छिद्र असणे, मतिमंद मुलांच्या विकासासंबंधित आजार,तसेच कुपोषण,व लहान मुलांचे सर्व आजार.
*कान नाक घसा*:- कानात घशाचे सर्व आजार.
*अस्थिरोग*:-संधिवात,मणक्यात असणारी गॅप वाकलेले पाय, फ्रॅक्चर, तसेच हाडांचे सर्व आजार.
*त्वचारोग*:-खाज,गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार.
*श्वसन रोग*:-दमा,बरेच दिवसाच खोकला, तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी.वरील सर्व आजारांची चाचणी व गरज भासल्यास ऑपरेशन पूर्णपणे निशुल्क करून देण्यात येईल.
डॉक्टरच्या सल्ल्याने जर ऑपरेशनची गरज असेल तर चेकअप नंतर सात दिवसाच्या आत ज्या ज्या ठिकाणी शिबिर होणार आहे त्या त्या ठिकाणाहून रुग्णांना हॉस्पिटलला नेण्याची निशुल्क सेवा देण्यात येणार आहे. हे शिबीर सिहोरा येथे ३ ऑगस्ट ला, करडी येथे ५ ऑगस्ट ला गोबरवाही येथे ७ ऑगस्ट ला,कांदरी येथे 10 ऑगस्ट ला,डोंगरी बुजरूक येथे 12 ऑगस्ट ला,चुल्हाड येथे 14 ऑगस्ट ,ला पालोरा येथे 17 ऑगस्ट ला,तुमचार येथे 20 ऑगस्ट ला, वरठी येथे 22 ऑगस्ट, खापा येथे नोव्हेंबरल, ऊसरा येथे 26 ऑगस्ट माड़गी येथे 28 ऑगस्टला,आंबा गड येथे 30 ऑगस्ट ला, नाकाडोंगरी येथे १ सप्टेंबर,आदळगाव येथे ४ सप्टेंबरला, देवाडी येथे ८सप्टेंबर, जाम येथे १० सप्टेंबरला गरा बगेडा12 सप्टेंबरला, मोहाडी खापा 15 सप्टेंबरला,हरदोली येथे 18 सप्टेंबरला,येरली येथे 20 सप्टेंबरला, मीटेवाणी येथे 22 सप्टेंबरला,नरसिंह टोला येथे 25 सप्टेंबरला, रोहा येथे 27 सप्टेंबरला, लोहारा येथे 29 सप्टेंबरला, लेंडे जरी १ ऑक्टोबरला डोंगरला 4 ऑक्टोबरला, डोंगरगाव 6 ऑक्टोबरला,नेरी ८ ऑक्टोंबर ला देवसर्रा 10 ऑक्टोबरला, हरदोली 14 ऑक्टोबरला, होणार आहेत.या
महाआरोग्य शिबिरा संबंधित माहिती जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहचावी जेणेकरून गरजु नागरिकांना शिबिराचा लाभ घेता येईल अशी विनंती आमदार राजू कारेमोरे यांनी केली आहे.