



इंडियन हैडलाइन न्यूज़/ लाखनी प्रतिनिधि
लोकसभेच्या पराभवाचा बदला विधानसभेत काढावा. विरोधकांच्या खोट्या बातम्यांना (फेक नरेटिव्हला) जशास तसे उत्तर आपण द्यायला हवे.” असे स्पष्ट प्रतिपादन भंडारा जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी केले. ते लाखनी तालुक्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना असं म्हणाले. या मेळाव्याला मोठ्या संख्येनं तालुक्यातील भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, बुथप्रमुख आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत चांगली मते मिळालेल्या टॉप टेन बुथवरील बुथ प्रमुखांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
लाखनी तालुक्याचा भाजप कार्यकर्ता मेळावा 12 ऑगस्टला संताजी मंगल कार्यालय, लाखोरी रोड येथे पार पडला. यावेळी प्रकाश बाळबुधे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रकाश बाळबुधे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकांनंतर हा मेळावा आज पार पडत आहे. लोकसभा निवडणूक आपण हरलो असलो तरी केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा विधानसभा जोषात लढायची आहे याबद्दल कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. इथल्या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले परंतु आपला पराभव झाला. पण, याचे कारण विरोधकच आहेत. विरोधकांनी खोट्या बातम्या (फेक नरेटिव्ह) पेरल्या, खोटी आश्वासने त्यांनी दिली. यातल्या खोट्या बातम्या म्हणजे संविधान बदलवणार, ओबीसींना न्याय मिळत नाही, अल्पसंख्याक असुरक्षित आहेत. तर त्यांची खोटी आश्वासने म्हणजे दर महिन्याला महिलांच्या खात्यात साडेआठ हजार जमा होणार या पद्धतीची पत्रके वाटली. यामुळे त्यांनी संभ्रम निर्माण केला. पण येणारी विधानसभा निवडणूक ग्रामपंचायत पातळीवर लढायची आणि विरोधकांना जशास तसे उत्तर द्यायचे.” असे बाळबुधे यांनी सांगितले.
योजना लोकांपर्यंत पोहोचवा – प्रकाश बाळबुधे
बाळबुधे पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, वयोश्री योजना या महत्त्वपूर्ण योजनांची जाणीव लोकांना करून द्या. शेतकऱ्यांसाठी या सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना वीज थकबाकी माफ केली आणि येणाऱ्या काळात वीजेचे बिल शेतकऱ्यांना लागणार नाही याची काळजीही घेतली आहे. तसेच पुढील काळात सौर ऊर्जेचा मोफत वापरही शेतकऱ्यांना करता येणार आहे. तसेच, 1% व्याजाने शेतकऱ्यांना पिकविमा कर्ज मिळणार आहे. या जनपयोगी योजना कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचवायला हव्या.”
या पदाधिकारी मेळाव्याला माझ्यासह भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे संघटन मंत्री मा. श्री. बाळाभाऊ अंजनकर, माजी आमदार मा. श्री. बाळाभाऊ काशिवार, भंडारा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष मा. श्री. शिवरामजी गिर्हेपुंजे, डॉ. मा. श्री. श्यामजी झिंगरे, प्रांत सदस्य मा. सौ.रेखताई भाजीपाले, ज्येष्ठ नेते मा. श्री. तु. रा. भुसारी सर, भंडारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष मा. श्री. हेमंतजी देशमुख, मा. श्री. पद्माकरजी बावनकर, डॉ. मा. श्री. सुदामजी शहारे, मा. श्री. घनश्यामजी खेडीकर, मा. श्री. म. वा. डोळे सर, मा. श्री. श्रावणभाऊ कापगते, मा. श्री. सत्यवानजी वंजारी,मा. श्री. मनिषजी वंजारी, मा. श्री. सुधाकर हटवार, मा. श्री. घनश्यामजी मते, , मा. श्री. शरदजी निर्वाण, मा. श्री. सुधीरजी राघोर्ते, मा. श्री. विक्रमजी रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.