इंडियन हैडलाइन न्युज/ गोंदिया प्रतिनिधी
गोंदिया शहरातील कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद यात्रेअंतर्गत आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 44.20 कोटी रुपये खर्चाच्या मुख्य रस्त्यांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत होणार आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत व नियमित व्हावी यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शहरातील अनेक रस्ते तयार करण्यात आले आहेत. भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोंदिया शहर अध्यक्ष जनता की पार्टी कशिश जयस्वाल यांनी केले आहे.