



इंडियन हैडलाइन न्युज/ भंडारा प्रतिनिधी
मा.नागरी पुरवठा मंत्री ना. श्री. छगन भुजबळ साहेब यांची मंत्रालयात विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. परिणयजी फुके, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. नेपालजी रंगारी आणि मी स्वतः भेट घेतली. धान खरेदी संस्थाच्या समस्यांबाबत यातही विशेषतः घट, कमिशन आणि गोडाऊन संदर्भात सकारात्मक चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली आहे. धान खरेदी संस्थांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक विचार करून प्रश्न मार्गी लावण्याचे मा. मंत्र्यांनी आश्वासन दिले. त्याबद्दलच्या थेट सूचना त्यांनी मा. सचिवांना दिल्या आहेत. यामुळे भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी संस्था आणि त्यांच्याशी संबंधित सर्व घटकांना दिलासा मिळणार आहे.