![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ तुमसर प्रतिनिधी
राजकीय निष्ठेची संबंध नसलेल्या वाघमारे यांना पक्ष प्रवेश कसा? या आषयाखाली बातमी प्रकाशित झाली त्यामध्ये चरण वाघमारे यांचा किती पक्षाशी संबंध आला अशी टीका वैयक्तिकरित्या चरणभाऊ यांचेवर करण्यात आली.यामध्ये सत्यता किती? हे या बातमीवरून दिसून येते चरण वाघमारे यांनी पक्ष बदलले नाही तर विचारधारेशी वाटीघाटी न केल्याने त्यांना पक्षांनीच निलंबित केले आणि निलंबन रद्दही केले.यामध्ये प्रामुख्याने विदर्भ विकास परिषदेचा सुद्धा उल्लेख करण्यात आला पण या दीडशहाण्यांना हे ठाऊक नाही की, विदर्भ विकास परिषद हा पक्ष नसून एक एनजीओ आहे जी सामाजिक क्षेत्रात काम करते राजकीय क्षेत्रात नाही.मनसेत चरणभाऊ कधी गेले नाही आणि त्या पक्षाशी संबंधही आला नाही. बी आर एस या पक्षात प्रवेश करून चरण भाऊंनी विदर्भ स्तरावर आपली छाप निर्माण केली पण या अतिशहाणे राजकीय नेत्यांना हेच माहीत नाही की बीआरएस ने तेलंगणातील पराभवानंतर महाराष्ट्रातील पक्षाचा काम बंद केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करते वेळी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतराव पाटील साहेब यांनी माननीय शरदचंद्र पवार साहेब आणि माननीय सुप्रियाताई सुळे यांचे समक्ष मी चरण वाघमारे यांच्यासोबत मागील अनेक दिवसापासून संपर्कात होतो* पण वाघमारे बीआरएस पक्षात असल्याने आमचे पक्षात आले नाही अशी माहिती टीव्ही चॅनलच्या माध्यमातून दिली आहे पवार साहेब आपल्या मार्गदर्शनातून बोलले मी नवा किंवा जुना असा समजत नाही ज्याची जी लायकी तशी जबाबदारी आमच्या पक्षात दिली जाते त्यामुळे चरण भाऊचा या विधानसभेतील लोकांच्या मनातील नेता असल्याने पक्षप्रवेश दिला आहे. *चरण वाघमारे केवळ तुमसर विधानसभेपुरते मर्यादित नसून विदर्भातील एक उत्कृष्ट नेता म्हणून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी भविष्यात आम्ही देऊ* असे सुद्धा सांगण्यास पवार साहेब विसरले नाहीत.आज महाविकास आघाडी मधील जे नेते चरणभाऊचा विरोध करत आहे ते कोणाच्या पैशावर उड्या मारत आहेत?हे महाविकास आघाडी मधील नेत्यांनाच नाही तर मतदारांना सुद्धा चांगले समजले आहे. दुसऱ्याचे भरोषावर आपला घर कसा चालेल? याचाच विचार करणारा एक नेता फितुऱ्याने सोबत केली वाकड्या ही पोस्ट टाकणारा नेता स्वतःला मोठा समजून ज्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये मिरवतो त्याची लायकी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांना चांगलीच कळली आहे. महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असताना सन्माननीय पवार साहेब यांच्या बाबतीत असे वक्तव्य करणे म्हणजे हे खरोखरच किती योग्य आहे? आणि शुद्धीवर तरी या माणसाने अशी टीका केली का?हा सुद्धा लक्षात घेण्यासारखा विषय आहे.चरणभाऊ च्या बाबतीत फितूर या शब्दाच्या जर प्रयोग करत असतील तर या महामुर्खांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा अध्यक्ष आणि सभापती बनवण्यासाठी मदत केली ,नानाभाऊंची अब्रू वाचवली तेव्हा चरण भाऊ फितूर नव्हते का?बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक लोकांनी भाजपची घंटा गळ्याला बांधली तेव्हा ते फितूर नाही झाले का? आणि एका नेत्याला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून समर्थन करून त्याला बाजार समितीच्या संचालक बनवला तेव्हा चरण वाघमारे फितूर नव्हता का?लोकसभा निवडणुकीत कोणतीही अट न ठेवता प्रशांत पडोळे यांच्या साठी मदत केली आणि नानाभाऊच्या अब्रूसाठी एकेकाळी दोन्ही जिल्ह्यांमध्ये राज्य करणारा पक्ष संपुष्टात आला असतांना पंचवीस वर्षानंतर या क्षेत्राला काँग्रेसचा खासदार मिळाला तोही चरण भाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून तेव्हा चरण भाऊ फितूर नव्हते का? जिल्हा मजुर संघ निवडणुकीत यांना मदत केली तेव्हा चरणभाऊची फितुरी यांना दिसली नाही का? हे सर्व करतांना चरण भाऊंनी कोणतीही अट ठेवली नाही.एक कडक नेता पंचायत समितीमध्ये असताना साधा बिडीओ ऐकत नव्हता तेव्हा चरण वाघमारे चे पाय चाटणारे कोण होते ? तेव्हा याला चरण वाघमारे फितुर दिसला नाही का? राहिला प्रश्न पक्षप्रवेशाचा भाजपने जुनी विचारधारा सोडली आणि चरणभाऊल तिकीट नाकारली तेव्हा चरण भाऊंनी पक्ष सोडला नाही तर जनतेच्या प्रेमापोटी विधानसभा निवडणूक लढवावी लागली आणि या क्षेत्रातील मायबाप जनतेने 80 हजार मते देऊन दाखवून दिलं की आम्हाला पक्षाची गरज नाही आम्हाला माणसाची गरज आहे. त्यामुळे असे विरोध करणारे किती येतील ज्या पद्धतीने हे लोक विरोध करतील त्याच पद्धतीने जनता यांना उत्तर देईल. आम्ही सर्व चरणभाऊच्या बाजूने राहू. एकंदरीत असे आरोप करताना या नेत्यांनी जनतेत यांची लायकी किती ?ही दाखवून दिली याबद्दल तुमचे आभार धन्यवाद