



इंडियन हैडलाइन न्युज/ भंडारा प्रतिनिधी
भंडारा/पवनी: शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना 2024 विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतून त्यांची उमेदवारी जाहीर होताच, भंडारा आणि पवनीत उत्साहाची लाट उसळली आहे. उमेदवारीची घोषणा होताच कार्यकर्ते आणि समर्थकांनी भंडारा व पवनी तालुक्यात जल्लोष साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा आणि पवनी तालुक्यांमध्ये केलेल्या विकास कामांची विशेष चर्चा संपूर्ण राज्यामध्ये केली गेली होती. त्यांनी राबविलेल्या विविध प्रकल्पांमुळे हे तालुके आता पर्यटनाच्या नकाशावर उभे राहतील, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे. श
पक्षाच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याची उधळण झाली आहे. “भोंडेकर यांचा विकासवादी दृष्टिकोन आणि कणखर नेतृत्व हीच या उमेदवारीची ताकद आहे,” असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाची खात्री व्यक्त करत, त्यांच्या तिसरा कार्यकाळ हा भंडारा-पवनीसाठी सुवर्णकाळ असेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
महायुती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आनंद
विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. “भोंडेकर यांचा विजय निश्चित आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे, आणि आगामी निवडणुकीत भोंडेकर विजयाचा झेंडा फडकावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.