![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा SVEEP कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदान जागृती उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या उपक्रमांतर्गत अशोक लेलँड औद्योगिक क्षेत्र गडेगाव येथे मतदान जागृती पर उपक्रम घेऊन औद्योगिक क्षेत्रातील लो वोटर एरिया मध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, मजूर यांना मतदानाचे महत्त्व लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या एका मताचा असलेला महत्व या विषयावर जिल्हा नोडल अधिकारी SVEEP रविंद्र सलामे यानी मार्गदर्शन केले.तहसीलदार धनंजय देशमुख, महसूल सहा. संजयकुमार राघोते॔,
तालुका SVEEP नोडल अधिकारी सुभाष बावनकुळे, विस्तार अधिकारी सुधाकर झोडे, जिल्हा सहायक नोटा अधिकारी SVEEP विनोद किंदले, अरुण मरगडे ,सुनील सावरकर, कैलास चव्हाण, अमित वैद्य. कंपनी व्यवस्थापक. एच आर धारगावे प्रामुख्याने उपस्थित होते.