



इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
समस्यांनी ग्रस्त व त्रस्त असून समस्यांच्या विळख्यासह चक्रव्यूहात सापडला असल्याने विकासाचा अभाव आहे. यास जबाबदार कोण हे मतदार बंधू भगिनींनी लक्षात घेऊन मतदानाच्या माध्यमातून खोकेबाजांना घराचा आहेर दाखवून कायमचे हद्दपार करावे . सुजाण मतदार बांधवांनो माझी खरी लढाई सर्व सामान्य जनतेस त्यांचे संविधान दत्त हक्क, अधिकार, न्याय प्रदान करून भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी असून
याकरिता मी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचार सभे प्रसंगी केले.
भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र जल, वन,खनिज या नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे. परंतु स्थानिक आमदारा महोदयांनी उद्योग, गृह उद्योग , लघुउद्योग ,स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले नाही.शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून दिले नाही. सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार,स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली नाही,हातमाग व्यवसाय पुनर्जीवित केला नाही. गाव तिथे बस सेवा सुरू केली नाही, गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्णत्वास नेले नाही .असे कितीतरी प्रश्न रखडलेले आहेत.त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचा विकास का झाला नाही? या क्षेत्राचा विकास कोणामुळे झाला नाही? हा खरा संशोधनाचा विषय आहे .स्थानिक आमदार महोदयांचे (लोक प्रतिनिधी)
हेतूपुरस्पर अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या क्षेत्राला समस्याचे
ग्रहण लागले असल्याने शेतकरी, शेतमजूर ,प्रकल्प ग्रस्त शेतकरी,कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार , गोरगरीब,शोषित पिडीत जनता कामासाठी वणवण भटकत असल्याची दस्तुर खुद नागरिकांची मोठी ओरड आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार महोदयांनी विकासाच्या नावाखाली शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत जनतेच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली असल्याने भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचा विकासाचा अनुशेष कमी होण्या ऐवजी वाढला आहे .हे चित्र बदलायचे असेल तर मतदार बंधू भगिनींनी मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन करणे काळाची गरज आहे.
भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजूर, कामगार ,भूमीहीन, सुशिक्षित,, बेरोजगार गोरगरीब,ज्येष्ठ नागरिक,महिला मंडळ,बचतगट संस्था तसेच तळागाळातील शोषित पिडीत सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यास पुढाकार घेऊन भंडारा पवनी विधान सभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी माझी खरी लढाई असल्याचे प्रतिपादन सर्व सामान्य जनतेचे तरुण , तडफदार,झुंजार,दमदार, लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचार सभे प्रसंगी केले आहे.
प्रचार सभेस सर्व सामाजिक संघटनांचे नेते , पदाधिकारी,कार्यकर्ते, हितचिंतक व सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून याबाबत जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.