![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर गावागावात सर्व सामान्य जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आणि लहर सुरू झाली असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत असून राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. समाजकारणातून राजकारण करतांना शेतकरी , गोसे प्रकल्प ग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,अन्याय अत्याचार ग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा,सर्वसामान्य नागरिकांच्या हक्क अधिकार ,न्याय ,हितासाठी झटणारा ,सतत कार्यकर्ते व जनतेच्या संपर्कात राहून सतकार्याला प्रथम प्राधान्य देऊन जनतेच्या सूख दुःखात सहभागी होऊन दिलासा देणारा अशी सामाजिक कार्यकर्ते तथा जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांची स्वच्छ प्रतिमा निर्माण झाली आहे. कोणत्याही मोठ्या पदावर नसतांना निःस्वार्थ पणे जनतेचे काम करण्याची त्यांच्यामध्ये किमया असून नरेंद्र पहाडे यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे ते एक प्रभावशील व्यक्तिमत्त्व
म्हणून उदयास आले असून भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील गावागावात जिकडे तिकडे नरेंद्र पहाडे यांच्या नावाची चर्चा आहे.
जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे हे उच्च शिक्षित असून कायद्याचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांना भंडारा पवनी विधान सभा क्षेत्रातील समस्यांची जाणिव आहे.ते सतत शेतकरी , गोसेप्रकल्प ग्रस्त शेतकरी ,शेतमजूर, कामगार,
भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार,विद्यार्थी ,गोरगरीब,शोषित पिडीत,अन्याय अत्याचार ग्रस्त नागरिकांची प्रत्यक्ष मोका भेट घेऊन ख्याली खुशालीची विचारपूस करीत असतात. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सनदशीर मार्गाने सत्याग्रह करीत असल्याने नरेंद्र पहाडे यांच्या सारख्या चारित्र्य संपन्न ,आणि
तळागाळातील सर्व सामान्य नागरिकांना समजून घेणाऱ्या अनुभवी ,नेतृत्वशील व्यक्तीची भंडारा पवनी
विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी नितांत गरज असून सर्व सामान्य जनतेचे तरुण ,तडफदार, झुंजार, दमदार लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या नावाची गावागावात चौफेर लहर सुरू असून मतदान देणार निवडून आणणार नरेंद्र पहाडे भाऊला मतदान रुपी आशीर्वाद देऊन आमदार बनविणार असा जनतेचा आवाज गुंजु लागला आहे.