![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
सुजान मतदार बंधू भगिनींनो मी ओ बी सी, एस सी, एन टी, व्हिजे एन टी, एस बी सी समाजाची विचारधारा समजून घेतली असून या विचारधारेशी सहमत राहून सामाजिक बांधिलकी ठेवली आहे .या बहुजन समाजाच्या समस्या,वेदना,व्यथांची मला पुरेपूर जाणीव आहे.नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी,प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कामगार , भूमीहीन, सुशिक्षित, बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत सुजान मतदार बंधू भगिनींनो मतदान करण्यापूर्वी एकमेकांशी विचारमंथन करून मला पोरगा, भाऊ, मित्र समजून माझ्या चुनाव चिन्ह तुतारी समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन परिवतानाचा धागा होऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी परिवर्तनाचा नवा इतिहास घडवावा असे कळकळीचे आवाहन जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचार सभेप्रसंगी केले.
नरेंद्र पहाडे पुढे म्हणाले की,मतदार बांधवांनो आपणांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी दहा वर्षाच्या काळात ज्या पद्धतीने भंडारा पवनी तालुक्याचा विकास करायला पाहिजे होता त्याप्रमाणे विकास केला नाही . त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. मतदार बंधू भगिनींनी मला सेवा करण्याची संधी दिल्यास सर्वात प्रथम पवनी तालुक्यातील एम आय डी सी क्षेत्रात नवीन उद्योग स्थापन करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल ,भंडारा तालुक्यातील एम आय डी सी परिसराचा विस्तार करून नवीन उद्योग स्थापन करण्यात येतील,शेतकरी बांधवांच्या शेतावर बारमाही सिंचनाची योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,भंडारा ते मुजबी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा चे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला बाध्य केले जाईल, भंडारा रोड रेल्वे स्टेशन ते भंडारा शहर ,पवनी तालुक्यापर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाईल,भंडारा शहरात वाहनांसाठी पार्किंग स्थळ तसेच वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी स्वयं चलीत कंट्रोल यंत्रणा कार्यान्वित केली जाईल,
नझुल कार्यक्षेत्रातील नागरिकांना पट्टे देण्यासाठी प्रयत्न केले जाईल,भंडारा ,पवनी,आणि अड्याळ , कोंढा कोसरा,पहेला या गावात भूमिगत विद्युत लाईन ची व्यवस्था केली जाईल, गोसे प्रकल्प ग्रस्त,पूर ग्रस्त तसेच पवनी उमरेड करांडला आणि कोका अभयारण्य प्रकल्प ग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, सौर व पवन ऊर्जा प्रकल्प निर्माण करणे,जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे,पवनी तालुक्यात शासकीय कृषी व मत्स्य महाविद्यालय सुरू करणे, गोसे प्रकल्पासह भंडारा पवनी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांचा पर्यटन दृष्ट्या विकास करणे, या समकक्ष इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी आपणा सर्वांचा सेवक म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन लोक कल्याणकारी काम करण्याची ग्वाही देत आहे.
तेव्हा सुजान मतदार बंधू भगिनींनो विरोधकांच्या कोणत्याही भूलथापा, प्रलोभन ,आमिषाला बळी न पडता माझे चूनाव चिन्ह तुतारी समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन परिवर्तनाचा धागा होऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी परिवर्तनाचा नवा इतिहास घडवावा असे आवाहन सर्व सामान्य जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचार सभे प्रसंगी केले.
प्रचार सभा ,रॅली मध्ये सर्व समाजाचे नेते ,पदाधिकारी, कार्यकर्ते स्वयं स्फुर्तीने सहभागी होऊन जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.