![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणीचे 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केंद्रावर वृत्त संकलन करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रादेशिक व जिल्ह्यातील शासनमान्य वृत्तपत्रांचे संपादक, त्यांचे प्रतिनिधी, उपग्रह वाहिन्यांचे प्रतिनिधी व त्यांचे कॅमेरामन यांना हिरव्या रंगाचे प्राधिकार पत्र दिले आहे, अशाच माध्यमांच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
माध्यम कक्षात माध्यम प्रतिनिधींना संपर्क करण्यासाठी इंटरनेट, संगणक, टिव्हीची व चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींना माध्यम कक्षापर्यंतच आपला मोबाईल वापरता येईल.
मतमोजणी केंद्राच्या दारावरून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या जागेवरूनच स्टील कॅमेरा किंवा मुव्हीज कॅमेरा वापरता येईल. आक्षेपार्ह कोणतेही चित्रण करता येणार नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी कक्षाच्या आतमध्ये मोबाईल घेवून जाण्यास परवानगी असणार नाही. याठिकाणी माध्यम कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत पाच किंवा त्यापेक्षा मर्यादित माध्यमांच्या प्रतिनिधींचा गट करुन पाहणी करता येईल. माध्यम कक्षातून फेरीनिहाय माहिती, परवानगी मिळालेले छायाचित्र माध्यम कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधींच्या व्हॉटसॲप ग्रुपवर प्रसिध्दीसाठी देण्यात येईल. असे जिल्हा निवडणूक विभागाने कळविले आहे.