![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: शनिवारी जेसीआय कुबेर आणि लेक लाडकी ग्रुप, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा येथील वृद्धाश्रमात सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कपडे, भेटवस्तू, मिठाई आदींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान ग्रुपच्या सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सहवासामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या सेवाभावी कार्यातून समाजात सकारात्मक संदेश दिला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, कार्यक्रमादरम्यान अनिल कारेमोरे, वंदना गभने, आणि कीर्ती कारेमोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भेटवस्तू वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गौरव नवरखेळे, रोषण रामटेके, अनिल गभणे, सुनील खानोलकर, प्रतिमा भोयर, वंदना गभणे, प्रा. मीनाक्षी खानोलकर, कशिश ठाकरे, पिऊ गभणे, व इतर सदस्य उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांवर कौतुक होत असून, समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.