![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
विनोबा नगर, गोवर्धन नगर व इंदिरा नगर तुमसर मधून जाणार्या तुमसर- तिरोडा बायपास रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे, रोड वरील गिट्टी वर आलेली आहे, रस्त्यावर जड वाहनांच्या वाहतुकी मुळे धुळीचा व टायरच्या प्रेशरने गिट्ठी उडून अपघात व नुकसान घडण्याच्या घटणा घडलेले आहेत आणि समोर मोठ्या प्रमाणात घडू ही शकतात. भविष्यात होणार्या दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी.
इंदिरा नगर, हनुमान मंदिर, मधू मिलन, बायपास रोड येथील बोरिंग ही कित्येक दिवसा पासून बंद अवस्थेत पडली आहे महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी काही नागरिकांकडे वापराच्या व पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच गोवर्धन नगर, बाय पास रोड, दीनानाथ मंगल कार्यकालया जवळील बोअरिंग ही मुख्य रस्त्यावर येत आहे कित्येक जड वाहनांच्या धडकेमुळे पाहिजे तो प्रेशर तयार होत नाही, विनोबा नगर, बावंथडी रेस्ट हाउस परिसर येथील बोअरींगची सुद्धा रस्त्याच्या उंचीने उंची वाढऊन डागडुजी करण्याची आवश्यकता आहे, सोबतच विनोबा नगर ओम शांती जवळील बोअरिंग सुद्धा रेपरिंग व डागडूची करण्यात यावी. या चारही बोरिंगचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे नगर परिषदने येत्या उन्हाळ्याची उपाययोजना बघता त्वरित योग्य दिशा निर्देश द्यावेत.
विनोबा नगर शिव मंदिर परिसर मधील नवीन पाईप लाईनला कित्येक ठिकाणी लिकेज आहेत त्याची सुद्धा दुरुस्ती करण्यात यावी.
वरील निवेदनावर लवकरच कारवाई झाली नाही तर छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान च्या वतीने आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद तुमसरची राहील अशा विविध प्रकारच्या मागणी करीता आज छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर तर्फे मुख्याधिकारी नगर परिषद तुमसर यांच्या कडे निवेदन देण्यात आले या वेळी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर चे अध्यक्ष इंजि. नितीन धांडे, उपाध्यक्ष वैभव साठवणे, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे उपस्थित होते.