![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ लाखनी प्रतिनिधी
लाखनी : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कलार समाज स्नेह मिलन सत्कार सोहळा उपवर वधू परिचय युवा संमेलन व मार्गदर्शन मेळावा मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून, कलार समाज गन कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहे कलार समाज लाखनी चे भव्य संमेलन सत्कारमूर्ती मा.ना. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल राज्यमंत्री महाराष्ट्र च्या हस्ते दीपप्रज्वलन करणार.
कार्यक्रमाचे सचिव सचिन ऊके इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क सोबत बोलतांनी म्हणाले की, शुभ मुहूर्तावर रविवार, ९ फेब्रुवारी 2025 रोजी कलार समाजातर्फे युवक-युवती परिचय संमेलन, सामूहिक विवाह सोहळा, उत्सव लाखनी येथे आयोजित करण्यात आला आहे. आयोजित कार्यक्रमाचे श्रेय समस्त लाखनी कलार समाज रहिवासी यांना जाते, या कार्यक्रमाची सुरुवात अल्पोपाहाराने करण्यात येणार असून, कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थिती युवा परिचय सम्मेलननाचे आयोजन करण्यात येणार असून कार्यक्रमाची सांगता स्वरुची मेजवानीने होणार असून. लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कलार समाजाचे प्रतिनिधी तुषार कमल पशिने (तुमसर) यांनी केले आहे.