



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि
महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा द्वारा आयोजित कार्यक्रमात दि. २७ मार्च रोजी माविम ला ५० वर्ष होताना सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण स्त्री-पुरुष समानता, संचेतना सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राचे कार्यक्रम राबवून महिलांना बळ देणाऱ्या व त्यांना पुढे आणण्यासाठी मदत करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पुरुषांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे, आ. नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोयते, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जिल्हा व्यवस्थापक भोंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन एकलारी येथील शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल भोयर व अस्मिता भोयर यांचा सत्कार करण्यात आला.