
गोंदिया: माननीय वित्तमंत्री महोदयांनी सदर केलेला अर्थसंकल्प २०२६-२७ हा ‘रिफॉर्म से रफ्तार’ चे जिवंत उदाहरण आहे. हा अर्थसंकल्प जागतिक आव्हानांमध्ये भारताच्या लवचिकता आणि उत्पादकता वाढवण्यावर केंद्रित आहे, ज्यात कॅपेक्सला १२.२ लाख कोटी पर्यंत नेऊन इन्फ्रास्ट्रक्चरला मजबूत पाया दिला आहे. गोंदिया सारख्या आदिवासी-प्रधान जिल्ह्यासाठी हा अर्थसंकल्प आशेची किरण आहे. पर्यावरण-अनुकूल सात हाय-स्पीड रेल कॉरिडॉर, केमिकल पार्क आणि रेअर अर्थ कॉरिडॉरच्या योजनांमुळे महाराष्ट्राचा औद्योगिक नकाशा बदलून जाईल. यामुळे गोंदियात उत्तम कनेक्टिव्हिटी, नवीन गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढतील – विशेषतः युवा आणि महिलांसाठी. अर्थसंकल्पात सेमीकंडक्टर मिशन २.०, बायोफार्मा शक्ती योजना आणि कृषी-टूल्सवर AI फोकस यामुळे आरोग्य, शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्र मजबूत होतील. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, दुर्मीळ आजारांवर सवलत आणि सौर ऊर्जा उत्पादनांवर कमी शुल्क यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला दिलासा मिळेल. मी या दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्पाचे हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आम्ही गोंदियाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणू, जेणेकरून प्रत्येक कुटुंब समृद्ध होईल. वंदे मातरम! जय महाराष्ट्र!!
लायकराम भेंडारकर: अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया




Total Users : 881828
Total views : 6486787
