
भंडारा: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. मध्यमवर्गीयांच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या या अर्थसंकल्पात युवक, बेरोजगार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक यांचा सर्वांगीण विचार करून नियोजन करण्यात आलेले दिसते. आरोग्य व्यवस्था बळकट करणे, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासावर भर देणे ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारताला मेडिकल टुरिझमचे केंद्र म्हणून विकसित करणे आणि औषधनिर्मितीचे जागतिक ‘हब’ म्हणून ओळख निर्माण करणे या बाबी विकसित भारताच्या संकल्पनेला पूरक ठरणाऱ्या आहेत.
यासोबतच देशात ७ नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली असून, यामुळे दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या रेल्वे कॉरि डॉरमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना मालवाहतूक सुलभ व कमी खर्चिक होणार असून ग्रामीण व शहरी भागांमधील आर्थिक दुवा अधिक मजबूत होईल. त्यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले आहे





Total Users : 883068
Total views : 6488500
