तुमसरच्या राजकारणात ‘भूकंप’ नव्हे, तर ‘सुनामी’! पत्रकार संघटनेचे ‘कारभारी’ थेट मैदानात; राजकीय पक्षांना ‘धनुष्यबाण’ आणि ‘घड्याळ’च्या नावाने ‘गिअर’ टाकावा लागणार!
तुमसर: आगामी तुमसर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुमसरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड धुमाकूळ माजला आहे. सामान्यपणे तटस्थ भूमिकेत असलेल्या शहर पत्रकार वेलफेअर संघटनेच्या दोन ‘मोठ्या’ नेत्यांनी थेट राजकीय आखाड्यात उडी घेतल्यामुळे येथील राजकारण शिगेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी दोन ‘शत्रू’ छावण्यांमध्ये प्रवेश करत तुमसरच्या राजकारणाचे वातावरण ‘बॉम्ब’ टाकून ढवळून काढले आहे! कारेमोरे…