Search
Close this search box.
थंड पाणी म्हणजे शुध्द नाही RO संच केंद्र तपासणी करण्याची गरज पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल द्वारा ग्राम कामठा में आयोजित सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह में 91 युगल हुए परिणयबध “महक के जुस्तजू ‘काव्य संग्रह का हुआ प्रकाशन,हिंदी भाषिक प्रेमियों ने दी बधाई” देव्हाडा बु. बाजारात रस्त्यावरच वाहनाची गर्दी धोकादायक अपघाताला आमंत्रण देणारी झाली. जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

कटंगी कला येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

सौ पूजा अखिलेश सेठ यांच्या प्रयत्नातून वर्ग खोली व प्रसुतीगृहा चे बांधकाम

गोंदिया: तालुक्यातील ग्राम कटंगी कला येथे सौ पूजा अखिलेश सेठ, सभापती, समाजकल्याण यांच्या प्रयत्नाने समग्र शिक्षा अंतर्गत वर्ग खोली 11.82 लाख रुपये व प्राथमिक आरोग्य विकास अंतर्गत प्रस्तुतीगृहाचे बांधकाम करीता 10 लाख रुपये असे एकूण 21.82 लाख रुपये बांधकामाच्या लोकार्पण सोहळाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते, सौ पूजा अखिलेश सेठ यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला.

याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, आमचे नेते खासदार श्री प्रफुल पटेलजी हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता सदैव कटिबद्ध आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. कोरोना काळात वैद्यकीय सुविधा पुरविण्यात श्री पटेलजी यांचे कार्य मोलाचे आहे. आरोग्याच्या सुविधा असो की सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन श्री जैन यांनी केले. 

मा. खासदार श्री प्रफुल पटेलजी व माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या क्षेत्राच्या अडी अडचणी सोडविण्यास कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही सौ पूजा अखिलेश सेठ यांनी दिली.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, सौ.पूजा अखिलेश सेठ, मोहिनी वराडे, अखिल सिंग, नन्दूभाऊ बिसेन, अखिलेश सेठ, श्री रमेश वरखडे, जी.के. कापसे, बि आर पटले, सुभाष बावनकर, आबिद भाई शेख, सुनीता लांजेवार, बी.डी.डोंगरे, राजू एन जैन, गणेश लांजेवार, राजुभाऊ मारवाड़े, डॉ. तुरकर, धन्नालाल बघेले, सदाशिव वाघाडे़, राजु मारवाडे, रविकला ताई, दीपकभाऊ डोंगरवार, शिशुपाल उपरीकर, मंजीत सहारे, गौतमाताई ऋषि, विमला उइके, सरिता चौधरी, कमलाबाई श्रीभाद्रे, निता नेवारे, दिपलता बानेवार, देवीका नागरिकर, संतोषी भागडकर ,तीर्थराज बघेले, प्रेमलाल नागपुरे, छमेंद्र नागरिकर, राजेश वराडे, दिलीप मोहनकर, प्रमोद नागपुरे, दीपक नागरिकर, डॉ सरिता ठाकुर, रौनक ठाकूर सहीत मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु लीना पटले तर आभार सौ जी के कापसे मॅडम यांनी केले.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
12:21 pm, May 20, 2024
temperature icon 40°C
clear sky
Humidity 17 %
Pressure 1003 mb
Wind 9 Km/h
Wind Gust Wind Gust: 15 Km/h
Clouds Clouds: 9%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:53 am
Sunset Sunset: 7:00 pm

Our Visitor

5 1 2 4 1 0
Total Users : 512410
Total views : 524448