![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
दिनांक ३०/६/२०२३ रोज शुक्रवार ला सकाळी ११: ते सायंकाळी ५: ००वाजे पर्यंत राष्ट्रीय मजुर कांग्रेस ( इंटक ) जिल्हा भंडारा च्या वतीने एक दिवसीय धरने आंदोलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा शहरात मागिल पांच ते सहा महिण्यापासुन गटार योजनेच्या नावाने शहर भ-यातिल संम्पुर्ण रस्ते खोदुन ठेवलेले आहे. जिल्हा इंटकच्या माध्यमातुन शहर वासियांच्या रस्त्याच्या समस्या भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणुन देऊन सुध्दा त्यांनी काही उपाय योजना केली नाही. या निमीत्याने जिल्हा इंटकच्या माध्यमातुन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक दिवसिय धरने आंदोलनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भंडारा शहर व जिल्ह्यातिल जनतेने या आंदोलनात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा इंटकचे अध्यक्ष धनराज साठवने यांनी केले आहे. धन्यवाद। आपला स्नेहांकीत। धनराज साठवने अध्यक्ष इंटक भंडारा जिल्हा।