
अर्जुनी मोर गोंदिया प्रतिनिधी/ अवि कुमार मेश्राम
अर्जुनी मोर गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभेत शासना विरोधात एल्गार_.
शैक्षणिक सत्र 2023- 24 सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटत असून देखील, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये शासनाच्या वतीने पदभरती च्या माध्यमातून अडसर निर्माण करण्यात आलेला आहे.
यासाठी शासन व प्रशासन यांनी योग्य पावले उचलून कार्यवाही करावी या संबंधाने गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 रोजी फुंडे सायन्स कॉलेज फुलचूर या ठिकाणी कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेत पवित्र पोर्टल च्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे शासनाच्या वतीने मागील पाच वर्षापासून ठरविण्यात आले ,परंतु योग्य प्रकारे कार्यवाही होत नसल्याने शाळा शिक्षकांविना ओसाड पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे.
यासाठी शासनाने सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांना मानधनावर नियुक्त करण्याचा फतवा काढला खरे पण मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असताना युवकांना रोजगार देण्याऐवजी सेवानिवृत्तांना कामावर घेणे हे कितपत योग्य आहे? याचा विचार किंचितही न करता नवीन पद भरती करण्याऐवजी,
जुनं ते सोनं समजण्याची चूक शासनाकडून होत आहे असे म्हटल्यास वावग ठरणार नाही. विविध शैक्षणिक समस्यांनी ग्रासलेल्या शाळांमध्ये, विद्यार्थी आधारावर आधारित संच मान्यतेचा तगादा शाळा प्रमुखांना त्रासदायक ठरत आहे .
शासनाच्या वतीने विविध योजनांचा पाढा वाचला जातो मात्र त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली जात नाही .
जसे मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या मोफत सायकलींचा निधी वेळेवर न मिळणे. विविध शिष्यवृत्तांची प्रतिपूर्ती न होणे. संच मान्यता विषयक समस्या .
स्टुडन्ट पोर्टल विषयक समस्या. इत्यादी बाबींवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले अध्यक्ष हे होते. सभेला प्रामुख्याने भूपेंद्र त्रिपाठी, दिलीप चाटोरे ,सी जी पाउलझगडे ,बी. पी .बीसेन ,रमेश तनवाणी ,श्री बारापात्रे,श्री. चौरागडे, जे .बी .कटरे ,कु. एस.डी.बघेले, श्रीमती बबिता भारद्वाज उपस्थित होते .
सभेचे प्रास्ताविक व संचालन कार्यवाही
संघाचे जिल्हा कार्यवाह ओमप्रकाशसिंह पवार यांनी पार पाडले .
आभार गोंदिया तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बी.पी.बिसेन यांनी मानले.





Total Users : 883161
Total views : 6488618
