
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
गंगाखेड:- महाराष्ट्रातील सर्व ऊसतोड कामगार, वाहन मालक ,मुकदम,ग्रुप लीडर बंधु भगिनींना कळविण्यात येते की, ऊसतोड कामगारांना माथाडी कामगारां प्रमाणे सोइ सुविधा मिळाव्यात, वाढत्या महागाईचा विचार करून तोडणी,वाहतुक ,व कमिशन मध्ये दर वाढ करावी,साखर संघाशी लवकरात लवकर नविन करार करुन वाहन मालक,मुकादमा ऐवजी निखळ ऊसतोड मजुरांची नोंदणी करून ओळख पत्र द्यावे.ऊसतोड कामगारांना कंपनी ऑकट नुसार सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
आशा विविध मागण्यांन साठी गंगाखेड येथे ऊसतोडणी ठेकेदार, वाहतूक ठेकेदार , ऊसतोड श्रमिक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची राज्य स्तरीय बैठक दि. ०५सप्टेंबर २०२३मंगळवार रोजी ठीक ११.३० वा. लॅर्ड वेंकटेश्वर मंदीर गोविंद राज पेट्रोल पंप च्या पाठीमागे क्रषी उत्पन्न बाजार समिती परीसर परळी रोड गंगाखेड येथे घेण्याचे आयोजित केले आहे . तरी सर्व ऊसतोड कामगार वाहन मालक मुकदम ग्रुप लीडर व सर्व पदाधिकारी बांधवांनी वेळेत हजर राहवे .हि विनंती या बैठकीस मा. अरुण भाऊ चव्हाण संस्थापक अध्यक्ष (गो.से.(सि) ऊसतोड श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र ) मा. सखाराम जाधव प्रदेश संघटक (गो.से.(सि) ऊसतोड श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र व संतोष भाऊ सोपान जाधव विभागीय अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत





Total Users : 883121
Total views : 6488562
