
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
लातूर :- आज दि.18सप्टेंबर2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,लांजी येथे मा. गणेश दादा हाके-पाटील प्रदेश प्रवक्ते भाजपा यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अहमदपूर पंचायत समिती चे सदस्य मा.माणिकराव बालाजी नरवटे यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी मदत करण्यात आली अध्यक्षस्थानी लांजी-तांबटसांगवी सोसायटी चे चेअरमन हरिभाऊ कदम होते तसेच ग्रुप ग्रामपंचायत लांजी- तांबटसांगवी चे सरपंचसाहेब मा.कालिदासजी साहेबराव कदम, जिल्हा परिषद लांजी शाळेचे मुख्याध्यापक तथा अहमदपूरचे केंद्रप्रमुख मा. नंदकुमार कोनाले सर,शाळा समिती उपाध्यक्ष मा.अब्बासजी पटेल,मा.खादर पटेल, मा.विनोद मुंढे, मा.बालाजीमुंढे,मा.ऋषिकेश कदम,यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मा.विकास पोपतवार,मा.जगदीश गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला.





Total Users : 883092
Total views : 6488527
