
तुमसर: शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथिल सहा.शिक्षक राहुल डोंगरे यांची प्र.मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि सामाजिक कार्यकर्ता रोहित बोंबार्डे यांना वकिली पदवी बहाल झाल्याबद्दल तुमसर तालुका प्रेस असोसिएसन तर्फे शाल व पुष्गुच्छ देवून सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.गुंज हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित पत्रकार सर्वश्री:- मनोहर भोयर, देवाभाऊ टेंभरे,अनिल कारेमोरे,राहुल भुतांगे,महेश गायधने,सुधीर गोमासे,सुरेंद्र चींधालोरे,जीवन वनवे, संजय नेमाडे,क्षितिज भुरे आदी पत्रकार मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन तुमसर तालुका प्रेस असोसिएशनचे सचिव अनिल कारेमोरे यांनी केले तर आभार सुधीर गोमासे यांनी मानले.





Total Users : 883240
Total views : 6488713
