
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
अहमदपूर तालुक्यातील सामाजिक व राजकीय कार्याचा दांडगा अनुभव असलेले गोविंद गिरी यांची लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पुनश्च निवड झाली आहे.
अहमदपूर व चाकुर तालुक्यातील प्रत्येक गावचा राजकीय परीपूर्ण अभ्यास असुन कुशल संघटक आहेत.प्रत्येक गावात गोविंद गिरी यांचा संपर्क असल्याने पक्ष वाढीसाठी येणाऱ्या काळात निश्चित फायदा होईल.
गोविंद गिरी यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा संपर्क मंत्री संजय भाऊ कौडगे,लातूर जिल्ह्याचे प्रभारी प्रा. किरण पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके,माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत चामे यांच्या हस्ते नुकतेच जिल्ह्याच्या पार्टी कार्यालयात देण्यात आले.
गोविंद गिरी यांच्या निवडीबद्दल खासदार सुधाकर श्रृंगारे , माजी मंत्री विनायकराव पाटील,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, आमदार रमेश आप्पा कराड, माजी सभापती अशोक काका केंद्रे,राजकुमार मजगे,त्र्यबक आबा गुट्टे यांच्या सह अहमदपूर व चाकुर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेते पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.





Total Users : 882918
Total views : 6488289
