
उदगीर तालुका प्रतिनिधी / चंचल हुगे
उदगीर:- अखेर बँक ऑफ महाराष्ट्रला यश आले गेल्या अनेक वर्षापासून दहा रुपयाचे नाणी ही बाजारात चालत नाहीत लोकांमध्ये अफवा पसरल्यामुळे ही नाणी नकली आहे, आणि सरकारने या दहा रुपयाची नाणी बंद केली आहे, अशी अफवा पसरल्यामुळे जनता ही नाणी स्वीकार करत नव्हती.. आता ही नाणी परत चालू करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने व व्यापारी असोसिएशन ने पुढाकार घेतल्यामुळे परत हे दहाची नाणी किल्लारी येथे चालु करण्यात आले आहे…
दहा रुपयाची नाणी चलनात आणण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र किल्लारी शाखेचे कॅशिअर श्री नरेश रंदाळे. व व्यापारी असोसिएशन अध्यक्ष श्री शरद दादा भोसले. मेडिकल असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिल स्वामी यांचा मोठा योगदान आहे. त्यांनी प्रत्येक दुकान ते दुकान जाऊन जाहिरात बाजी करून सर्वांना दहा रुपयाची नाणी घेण्याचे आणि देण्याचे आव्हान करून सांगितले… व सर्व दुकानी थोडे थोडे दहाची नाणी देऊन एक लाख दहा हजाराची नाणी वाटप करण्यात आली या वेळी शाखेचे व्यवस्थापक श्री सतीश कुमार श्री सचिन जमादार प्रल्हाद बनसोडे बी सी एजंट नितीन पोतदार आदी उपस्थित होते. व्यापारी असोसिएशन व जनतेने आभार मानले..





Total Users : 883092
Total views : 6488527
