
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
श्रीमती गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय, तुमसर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागात द्वारे महाविद्यालयात “राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस “अतिशय थाटाने साजरा करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या मनात सामाजिक ऐक्य, बांधिलकी व समाजाप्रती कर्तव्याची जाणीव निर्माण करणे व त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे या उद्देशाने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग सतत कार्यरत आहे. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलित करून झाले .
त्याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मुबारक कुरेशी यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे व कार्य प्रणाली स्पष्ट केली. तसेच स्वयंसेविकांना सतत राष्ट्र सेवा करिता तत्पर राहण्याचे राहण्यास प्रेरित केले . कार्यक्रमाचे चे प्रमुख अतिथी डॉ. अरुणा देवगडे यांनी विद्यार्थिनींना राष्ट्रीय सेवा योजना च्या नानाविध कार्यक्रमात सहभागी होण्यास कडकडीने आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा.डॉ.कल्पना शिंदे यांनी देशाच्या पुढार्यांचा व विशेष म्हणजे स्वामी विवेकानंदाचा राष्ट्र निर्माणात कसा सिंहाचा वाटा आहे ,हे स्पष्ट करून त्यांची प्रेरणा घेऊन सामाजिक कर्तव्याची पूर्तता करावी असे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविकांनी निरपेक्षपणे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक ऐक्याच्या रक्षणाकरिता स्वयंसेवाची प्रतिज्ञा घेतली. या प्रित्यर्थ महाविद्यालययात परिसर स्वच्छता सुद्धा घेण्यात आली .कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. मुबारक कुरेशी यांनी केले तर आभार बीए तृतीय वर्षाची राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कु.अपेक्षा गिरीपुंजे हिने केले . कार्यक्रमाला प्रा.गायत्री सिरसाम, प्रा. अंकिता जंजाळ उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. युवराज सेलोकर ,तसेच शिक्षकेतर कर्मचारी कुमुद पारधी, मालू पेशने, श्रीकृष्ण तीतीरमारे व रा से यो स्वयंसेविका कु. सेजल तितरमारे, कु. भार्गवी शेंडे यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.





Total Users : 883062
Total views : 6488494
