
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
श्री सुदामा शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित श्रीमती गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 28 सप्टेंबर 2023 ला स्थापना दिवसानिमित्त व्यवस्थापकीय मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिन व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले.

सर्वप्रथम संस्थेचे सचिव माननीय प्रमोद भाऊ तितिरमारे व किरणताई प्रमोद तितिरमारे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर गृह अर्थशास्त्र विभागाअंतर्गत आयोजित “शिकता शिकता कमवा” या उपक्रमांतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर आनंद मेळाव्याचे उद्घाटन सौ. किरणताई प्रमोद तितीरमारे व सौ. प्रतिभाताई युवराज सेलोकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास विद्यार्थिनींनी भरघोस प्रतिसाद दिला. आनंद मेळाव्यात विविध पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले. आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष 2023 निमित्त आरोग्याला लाभदायक मिलेट्सचा वापर दैनंदिन जीवनात व्हावा या उद्देशाने बाजरी, नाचणी, भगर यापासून तयार केलेल्या पदार्थांचे स्टॉल हे या आनंद मेळाव्याचे विशेष होते. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. संस्थेचे सचिव माननीय प्रमोद तितिरमारे माननीय विनोद तितिरमारे व प्राचार्य डॉक्टर युवराज सेलोकर यांनी विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक विकास मेश्राम, गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना राऊत तसेच डॉक्टर नीता सोमनाथे, डॉक्टर मुबारक कुरेशी, डॉक्टर अरुणा थुल , प्राध्यापक मंगेश वागदे, प्राध्यापक गायत्री शिरसाम, प्राध्यापक अंकिता झंझाळ, डॉक्टर उमेश चव्हाण, प्राध्यापक अशोक चोपकर, डॉक्टर गामा सेलोकर आणि शिक्षकेतर कर्मचारी कुमुद भुरे, मालू पेशने, संजीवनी देशमुख, श्रीकृष्ण तितिरमारे, देवेंद्र मंडपे इत्यादी उपस्थित होते.





Total Users : 883161
Total views : 6488618
