
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
जमैत-उलेमा-ए-महाराष्ट्र या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज माझी व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेतली व त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ व सहकार मंत्री ना. दिलिप वळसे पाटील हे देखील उपस्थित होते.
पाच टक्के मुस्लिम आरक्षण, मुस्लिम मुलींसाठी वसतीगृह, मॉब लिचिंग सारख्या घटनांबाबत कारवाई, अल्पसंख्याक महामंडळावर पदाधिकारी लवकरात लवकर नेमण्यात यावेत, वक्फ बोर्डाच्या जमीनींचे संरक्षण करावे, हज यात्रेला जाणार्या हज यात्रेकरुंच्या विमान भाड्यात तफावत असते ती एकच असावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी यावेळी दिले.
धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन सामाजिक एकोपा कसा राखला जाईल यासाठी पक्ष नेहमीच काम करता असून संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करु, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.





Total Users : 883251
Total views : 6488727
