
अर्जुनी मोर: परसटोला ग्रा.पं.च्या विकास कामांचा आढावा घेतला. 15 वा वित्त आयोग, मनरेगा, मातोश्री पांदन रस्ता, प्रधानमंत्री आवास योजना याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. गटग्रामपंचाय परसटोला येथिल तिन्ही गावांच्या विकास करण्यावर माझा भर असेल. येत्या काळात विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल , अशी सुचना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिली. यावेळी उपस्थित भरणोली पं.स. क्षेत्राचे सदस्य फुलचंद बागडेरीया , ग्रा.प. सरपंच रामु कुंभरे, सदस्य तालुकाध्य्क्ष लोकपाल गहाणे, तंटामुक्त अध्यक्ष कुंडलिक कोवे, पोलिस पाटील गिरीधर रक्षा, नरेंद्र लोथे, ग्रा.प. सदस्य, प्रितम रामटेके, सौ. छबिला शहारे, स्नेहा मांडवगणे तलाणे, रोजगार सेवक युवराज गहाणे, के. वर्षा मेश्राम कृषी पर्यव्यक्षक होलगिरे कृषी सहाय्यक आणि गावातील नागरिक प्रमुख उपस्थित होते.





Total Users : 883253
Total views : 6488729
