
प्रतिनिधी/गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचे युवा अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे जिल्ह्यात सुरु आहेत. ग्राम पंचायत तुमसर येथे जल जीवन मिशन जिल्हा निधी तसेच मग्ररोहयो अंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यात 35 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ता बांधकाम पूर्ण झाल्याबद्दल लोकार्पण तसेच 173.16 रुपयांच्या पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पकंज रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.
या निमित्याने प्रामुख्याने पंकज रहांगडाले, डॉ.लक्ष्मण भगत जिप सदस्य, मनोज बोपचे सभापती पस. गोरेगांव, रामेश्वर महारवाडे, पस.गोरेगांव, योगिता देशमुख सरपंच तुमसर, तसेच समस्त ग्राम पंचायत सदस्य, व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.





Total Users : 883068
Total views : 6488500
