Search
Close this search box.
थंड पाणी म्हणजे शुध्द नाही RO संच केंद्र तपासणी करण्याची गरज पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल द्वारा ग्राम कामठा में आयोजित सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह में 91 युगल हुए परिणयबध “महक के जुस्तजू ‘काव्य संग्रह का हुआ प्रकाशन,हिंदी भाषिक प्रेमियों ने दी बधाई” देव्हाडा बु. बाजारात रस्त्यावरच वाहनाची गर्दी धोकादायक अपघाताला आमंत्रण देणारी झाली. जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींकडून,गुन्ह्यातील चोरलेले 18 लाख 6 हजार रुपयाचे 384 ग्रॅम सोने व एक पिस्टल हस्तगत. 3 आरोपींना अटक. अहमदपूर पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी

उपसंपादक / राठोड रमेश पंडित 

अहमदपूर:- याबाबत थोडक्यात महिती अशी की, 17 जून ते 19 जून 2021 मध्ये मध्यरात्रीचे वेळी पोलीस ठाणे अहमदपूर येथील सराफा व्यापारीच्या घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व एक पिस्टल चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुरनं 279/2021 कलम 454, 457,380 भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होता. सदर गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आटोकाठ प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी रेकॉर्डवरील तसेच शेजारील जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांना ताब्यात घेऊन विचारपूस करून तपास करण्यात आला. गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती मिळवण्यात येत होती. परंतु सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागत नव्हता. गुन्हा घडून खुप कालावधी होऊनही सदरचा गुन्हा उघडकीस न आल्याने सदरचा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदपूर मनीष कल्याणकर यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे अहमदपूर चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासाबाबत सूचना देण्यात आले होते.

तपासा दरम्यान पोलीस पथक गुन्ह्याची पद्धत, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे विश्लेषण करून तसेच गोपनीय बातमीदार नेमून माहिती मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते दरम्यान तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावरून आरोपी नामे

 1) राम तुकाराम बने, वय 27 वर्ष, राहणार गायकवाड कॉलनी, अहमदपूर.

2) विजय अशोक कदम, राहणार गायकवाड कॉलनी, अहमदपूर.

3) केदारनाथ नामदेव गाडे, वय 29 वर्ष, राहणार रुई तालुका अहमदपूर.

यांना दिनांक 24 आक्टोबर 2023 रोजी ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरलेले 17 लाख 66 हजार रुपयाचे सोने व एक पिस्टल असा एकूण 18,06,400 रुपयांचा मुद्देमाल काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर देडे करीत आहेत. तपास पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय कुशलतेने, गुन्ह्याच्या पद्धतीचा बारकाईने विश्लेषण व अभ्यास करून,रेकॉर्डवरील गुन्हेगारांची गोपनीय माहिती मिळवून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने व पिस्टल परत मिळविले आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी,अहमदपूर मनीष कल्याणकर यांचे मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे नेतृत्वातील टीम मधील अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस अंमलदार तानाजीआराद्वाड , राजकुमार डबेटवार, बापू धुळगुंडे, रुपेश कज्जेवाड, पाराजी पुठेवाड यांनी चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
1:59 am, May 21, 2024
temperature icon 33°C
broken clouds
Humidity 35 %
Pressure 1003 mb
Wind 22 Km/h
Wind Gust Wind Gust: 33 Km/h
Clouds Clouds: 74%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:52 am
Sunset Sunset: 7:00 pm

Our Visitor

5 1 2 4 4 4
Total Users : 512444
Total views : 524489