Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

कुठल्याही अटी शर्ती शिवाय सुरु करा धान खरेदी प्रफुल्ल पटेल यांची फेडरेशनच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा 

गोंदिया : शासनाने शासकीय धान खरेदी संस्थाना धान खरेदी करण्यासाठी कुठल्याही अटी शर्ती न लावता जुन्याच निकषानुसार त्वरित धान खरेदी सुरु करावी, दिवाळीपुर्वी धान खरेदीला सुरुवात होणे अपेक्षित असताना अद्यापही धान खरेदी सुरु झालेली नाही. यावर खा. प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.१०) तीव्र नाराजी व्यक्त करीत मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक श्री धपाटे यांना त्वरित धान खरेदी सुरु करण्यास सांगितले.

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीसाठी शासनाने यावर्षी नवीन निकष लावले होते. त्यामुळे धान खरेदी संस्थानी धान खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान याप्रकरणी खा. प्रफुल्ल पटेल यांनी लक्ष घालून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर १ नोव्हेंबरला या विषयावर मुंबई मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जुन्याच निकषानुसार धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासंबंधिचा जीआर देखील काढण्यात आला. पण गुरुवारी (दि.९) शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश काढले. पण त्यात धान खरेदी संस्थाना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र तसेच केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची जातीचा उल्लेख व संस्थांना काही अटी शर्थी लागू केल्या आहे. त्यामुळे धान खरेदी संस्थांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान ही बाब माजी आ. राजेंद्र जैन यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा खा. प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.१०) सकाळी मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक श्री धपाटे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसेच धान खरेदी सुरु करण्याच्या आदेशातील संपूर्ण अटी शर्थी रद्द करुन जुन्याच निकषानुसार धान खरेदी त्वरित सुरु करण्यास सांगितले. यावर महाव्यवस्थापक धपाटे यांनी लावल्या अटी शर्थी रद्द करुन खरेदीला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने कुठल्याही आडकाठी विना त्वरित शासकीय धान खरेदीला सुरुवात करावी. धान खरेदी संस्था आणि शेतकऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी.

– प्रफुल्ल पटेल,खासदार

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
1:04 pm, May 14, 2024
temperature icon 37°C
clear sky
Humidity 23 %
Pressure 1008 mb
Wind 4 Km/h
Wind Gust Wind Gust: 10 Km/h
Clouds Clouds: 2%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:55 am
Sunset Sunset: 6:57 pm

Our Visitor

5 1 2 0 1 8
Total Users : 512018
Total views : 523846