
तुमसर प्रतिनिधि/ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित गीताचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर व प्रतिष्ठान च्या सर्व शाखांच्या वतीने दरवर्षी दि. 12 जानेवारी ला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती, युवा दिवसाचे औचित्य साधून किल्ले आंबागड येथे किल्ले सफाई करून गडसंवर्धनाचे महत्त्व सांगितले जाते. यावेळी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने व स्व. बाबुरावजी मेंढे प्रतिष्ठान, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेस विशाल स्वरुप प्राप्त करून दिले. प्रस्तुत समयी किल्ले आंबागडाच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती कार्यक्रमाने मोहिमेची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी महोदय, आदरणीय श्री. योगेशजी कुंभेजकर तर अध्यक्षस्थानी सौ. शुभांगीताई मेंढे, अध्यक्षा स्व. बाबुरावजी मेंढे प्रतिष्ठान, भंडारा या होत्या. माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजन व माल्यार्पणानंतर सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या संबोधनातून प्रतिष्ठान च्या मागणीनुसार किल्ले आंबागड पर्यटन विकास संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले हे विशेष. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान कडून तयार केलेल्या गीताचे लोकार्पण करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी सौ. शुभांगीताई मेंढे, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अतुल गुरू, सदस्य, महाराष्ट्र गड विकास महामंडळ, श्रीमती. स्मिता अंबादे, प्राचार्य कला व वाणिज्य विद्यालय, करडी, श्री.घाटे सर, अधीक्षक, शासकीय आदिवासी वसतिगृह, तुमसर इत्यादी उपस्थित होते. जयंती कार्यक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्याचे खासदार आदरणीय श्री. सुनील मेंढे साहेब यांच्या मार्गदर्शनातून व स्व. बाबुरावजी मेंढे प्रतिष्ठान च्या वतीने जाणावे गड किल्ले मोहिमेतील गड किल्ले दर्शनासाठी गेलेल्या मावळ्यांचे विविध अनुभव त्यांनी उपस्थितांना ऐकविले, स्प्रिंगडेल शाळा भंडारा येथील विद्यार्थ्यांनी महाराजांवर आधारित पोवाड्याच्या सुरांनी अवघा आसमंत दुमदुमून टाकला. तर भंडारा येथील कला पथकाने सादर केलेल्या अफजल खान वध प्रसंगाचे हुबेहुब सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक /अध्यक्ष इंजि. नितीन धांडे यांनी तर सूत्रसंचालन प्रतिष्ठान चे मार्गदर्शक व सचिव प्रा. अमोल उमरकर यांनी केले. यानंतर किल्ले आंबागड चढाई करून तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला यात प्रामुख्याने स्प्रिंगडेल शाळेतील विद्यार्थी व शिक्षक गण, शासकीय आदिवासी वसतिगृह येथील विद्यार्थी व कर्मचारी वर्ग, करडी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग तसेच छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर उपाध्यक्ष विक्की साठवणे, कोषाध्यक्ष प्रतीक बुधे,आंबागड शाखेचे अध्यक्ष जय मोरे, बघेडा शाखेचे अध्यक्ष नवनीत चौधरी, सचिव शुभम निमकर, केसलवाडा शाखेचे अध्यक्ष रुपेंद्र वहीले, सुमित जीभकाटे, नितिन सार्वे, अंकुश गभने, मयूर पुडके, तुषार बागडे, युवनेश धांडे, प्रज्वल बुधे, मनोज बोपचे, प्रेमलाला तिजारे, साहिल धार्मिक, क्रिश शेंडे, दत्ता दमाहे, सोहम नावकरकर, धनंजय समरीत, निश्चय गजभिये, प्रवीण धांडे, साक्षी चन्ने, दिपाली मते, गुंजन ढबाले, कनक नागमोते, दिव्या धुवे, डिंपल गोमासे, हिमांशी गोमासे, कशक चव्हाण, तसेच व इतर सर्व पदाधिकारी व सर्व शाखेतील मावळे यांच्या श्रमदानातून प्रस्तुत मोहीम संपन्न झाली.





Total Users : 895442
Total views : 6505858
