इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा : भंडाऱ्याचा विकास करायला आम्ही सक्षम आहोत आणि यांची उत्तम उदाहरणे गेल्या अडीच वर्षातच दाखवून दिली आहेत. गेल्या 25 वर्षातिल कोणताही आमदार जे करू शकला नाही ते आम्ही करून दाखविले आहे. म्हणून पार्सल करण्यात आलेल्या उमेदवारांनी आमच्या भंडाऱ्याचा विकास कसा करावा हे आम्हाला शिकवायची गरज नाही. असा सल्ला शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कोंग्रेस, रिपाई महायुती चे उमेदवार आम. नरेंद्र भोंडेकर यांनी विरोधकांना दिला. ते पुढे म्हणाले की स्वतःला आमदार झालो असे समजणारे विरोधक विरोधाच्या ओघात हे ही विसरत आहेत की ते स्वतः भंडाऱ्याचे नसून त्यांना पार्सल करण्यात आले आहे आणि आमच्या भंडाऱ्याचा विकास कसा करायचा आहे हे पार्सल करण्यात आलेल्या उमेदवारांनी आम्हाला सांगायची गरज नाही आणि भंडाऱ्याच्या विकासाची एवढीच चिंता होती तर ते पाच वर्षे भंडाऱ्यात राहून जनतेची सेवा केली असती. म्हणून मतदारांनी अश्या पावसाळी बेडकांसारख्या उमेदवारांपासून सावध राहण्याचे आवाहन मतदारांना केले. ते आज पवनी तालुक्यातील विविध गावात आयोजित सभेला संबोधित करीत होते.
पवनी तालुक्यातील कोंढा, सोमनाळा, सेंद्रि बू., खैरी, निघवी, रनळा, गोसे सह अन्य गावांमध्ये प्रचार रॅली काढली. या रॅलीत गावातील महिला, पुरुषांसाह बाल गोपालांनी सुद्धा सहभाग घेतला. यंग गाव गावात आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या कामाची चर्चा असून नगरिकांच कौल भोंडेकरांकडेच दिसून येत आहे. अश्यात आज झालेल्या सभेला संबोधित करतांना शिवसेना महायुती चे उमेदवार आम. भोंडेकर म्हणाले की नोकरी म्हणजेच आमच्यासाठी रोजगार आहे हा गैरसमज पसरविण्यात काही राजकारणी आघाडीवर आहेत. पण वेग वेगळ्या विकास कामांमधूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याचे आकलन करण्याची क्षमता नसलेल्यांनी रोजगार नाही म्हणून बोंबा मारणे सोडावे आणि मतदारांनी या अपप्रचाराला आहारी जाऊ नये. ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या धुमाळीत त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मागील अडीच वर्षाच्या काळात भंडारा विधानसभा मतदारसंघात आलेले परिवर्तन आणि झालेली विकास कामे लक्षणीय आहे. यात विकास कामांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती चे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे. वैनगंगा नदीवरील जल पर्यटनाचा प्रकल्प जिल्ह्याला जागतिक स्तरावर कीर्ती मिळवून देणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दहा हजाराहून अधिक तरुण-तरुणी आणि नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे रोजगार देण्यास समर्थ आहे. रोजगाराच्या संधी म्हणजे नोकरी यात गुरफटून न राहता पर्यटन आल्यास राहण्याची, दळणवळणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर उभी करावी लागेल. यातूनही अनेकांना रोजगार मिळेल. वेगवेगळे व्यवसाय या निमित्ताने सुरू होतील. पर्यटन स्थळी अनेकांच्या हाताला काम मिळेल. या सर्व गोष्टींचा विचार करून रोजगाराची व्याख्या विरोधकांनी करावी. रोजगार म्हणजे काय हे कळत नसेल तर त्यांनी या विषयावर बोलूच नये. आम. नरेंद्र भोंडेकरांनी विरोधकांना सल्ला देत म्हणाले की भंडाराच्या विकासाची चिंता करायला आम्ही सक्षम आहो, बाहेरून आलेल्या पार्सल ने आम्हाला विकास म्हणजे काय ते शिकवायची गरज नाही.