पूर्व विधायक अग्रवाल ने किया डॉ. आंबेडकर का अभिवादन काचेवानी रेल्वे ओव्हरब्रिजच्या समस्या मार्गी लावा – आ.विजय रहांगडाले यांनी केली अधिका-यासोबत पाहणी  एकलारी येथे परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम एकलारी येथे प्रभु “श्रीराम जन्मोत्सव सोहळा” कार्यक्रम शिव महापुराण कथा मिटाती है जीवन की व्यथा: वैभवीश्री जी (गोकुल वृंदावन) श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह निमित्त आरोग्य शिबीर आयोजन: सुनील भोयर पुरुष सुधारक सन्मान सुनिल भोयर पुरस्काराने सन्मानित अशोक चौधरी बने जायसवाल सर्ववर्गीय महासभा के वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष शाळेच्या नियमाप्रमानेच करण्यात आली कारवाई “पत्रकार परिषदेत खुलासा” प्रभु श्रीराम हर हिन्दु की आस्था के केन्द्र और आदर्श – पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल
ENGLISH INDIAN HEAD LINES CALENDER 2025
HINDI INDIAN HEAD LINES CALENDER 2025
Gopaldas Agarwal Gondia Ram Vavmi Add 2025
JAYANTI BHAI JWELLERS TUMSAR
Gopaldas Agarwal Gondia Ram Vavmi Add 2025.
3
ind
4

अदानीने कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या :खा.डॉ.प्रशांत पडोळे

अदानीने कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या :खा.डॉ.प्रशांत पडोळे उपोषन कर्ते कामगारांच्या पाठीशी आहो दिवसेदिवस प्रकृती खालावत आहे. उपोषण कर्त्याची भेट घेऊन विचारपुस केली. अदानी पॉवर प्लांटच्या Md शी केला संपर्क कामगार अधिकारी यांच्याशी केला!

TUSHAR PASHINE PRESS I CARD
TUSHAR I CARD PRESS AHILYARAJ

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क भंडारा/गोंदिया प्रतिनिधि 

भंडारा/गोंदिया :- शिवाजी,फुले,आंबेडकर, मिशन प्रणित महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना संघटने मार्फत तिरोडा येथे कामगार उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.


१) महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारां प्रमाणे अदानी विज केंद्रातील कामगारांना मुळ वेतनात १९ टक्के पगार वाढ तसेच माहे एप्रील २०२४ पासुन ते आजतागायत ऐरिअर्स देण्यात यावा.

) महानिर्मिती कंपनीचे कामाचे स्वरूप पहाता महानिर्मिती कंपनीचे कंत्राटी कामगारांना देय असलेले विविध भत्याचा पगार अदानी पायर लिमीटेडचे कामगारांना देण्यात यावा.

३) अदानी पावर लिमिटेडचे नियुक्त कंत्राटदारांचा कार्यादेश समाप्त होत असतांना, निरंतर कामे करित असलेल्या कामगारांस विनाशर्त ग्रच्युटीचा पगार अथवा अनुदान राशी देण्यात यावी.

४) अदानी पावर लिमिटेड येथील सर्व कंत्राटी कामगारांना २२ लाख रुपयाचा विमा जाहीर करण्यात यावा.

) अदानी पावर लिमिटेडचे कंत्राटी कामगार वयाची साठ वर्ष सेवा देत, सेवानिवृत्त होत असतांना भावी जिवन व्यतीत करण्यासाठी प्रतीवर्ष १ लाख रुपये प्रमाणे आर्थीक मदत देण्यात यावी.

६) अदानी पावर लिमिटेड येथील ९ कंत्राटी कामगारावर २०१७ मध्ये चुकीच्या पद्धतीने लावलेल्या कैसेस तात्काळ बंद करण्यात याव्या व शोषीत पिडीत कामगारांना रोजगार देण्यात यावा.

७) अदानी पावर लिमिटेड येथील रामाटोला हे गाव प्रकल्प ग्रस्त असून शासन परिपत्रकानुसार स्थानीक व लगतच्या परिसरातील बेरोजगारांना ८० टक्कै रोजगार देण्यात यावा

८) दि. ३०.०९.२०२४ व दि.०३.१२.२०२४ रोजी कामगारांनी ग्रेच्युटी व विविध प्रलंबीत न्यायीक मागण्या करिता टुल डाऊन आंदोलन केले होते अशा कामगारांना त्वरीत न्याय देण्यात यावा.

९) अदानी पावर लिमीटेडचे अधिकार क्षेत्रात सेवा देत असतांना अनेक कामगारांचे निधन झालेले आहे अशा मृतक कामगारांचे निराधार कुटुंबियातील वारसास प्राधान्याने सहानुभुतीपर रोजगार देण्यात यावा.

१०) अदानी पावर लिमिटेड येथील विविध कंत्राटदाराचे कामगारांना प्रस्थापीत कामगार कायध्यानुसार पेमेंट ऑफ लिव्ह, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी, पेमेंट ऑफ बोनस सरसकट देण्यात यावा.

११) लिफ्ट अॅन्ड शिफ्ट पुर्ववत कंत्राटात निधन झालेला कामगार अमितकुमार जांभुळकर रा. बेरडीपार या मृत्यु कामगाराचे निराधार कुटुबियातिल वारसानची पत्नी तनुजा अमितकुमार जांभुळकर यांना महिलेला रोजगार देण्यात यावे.

१२) एस.एम.एस. कंपनीचे कार्यरत कामगारांना नियमानुसार महिन्याचे २६ दिवस रोजगार व युनीफार्मचे कपात केलेली रक्कम बँक खात्यात जमा करण्यात यावी. तसेच जे कामगार अनलोडींग चे काम करीत आहेत अशा कामगारांना अनलोडींग चे वेतन देण्यात यावे.

१३) गार्डन मेंटनन्सचे पुरुष व महिला कामगारांना बेकायदेशिर १७ ते १८ दिवस रोजगार देण्यात येत असुन नियमाप्रमाणे २६ दिवस रोजगार देण्यात यावा.

१४) मानव ट्रेडर्सचे पुर्ववत कंत्राटात 1) रीना महेश सांगोळे 2) मनीषा महेश मुळे 3) नरेंद्र चैत्राम भैसारे 4) सुनिता नर्मद गावडे या अन्यायग्रस्त कामगारांस कामावरुन कमी केलेले आहे, सध्यस्थित लक्की कंट्रक्शनचा कंत्राट सुरु असुन सदर गार्डन मेंटनन्सचे कंत्राटात पिडीत कामगारांना कामावर रुजु करण्यात यावे.

१५) अॅक्वा फॅसिलीटीचे उमेश टेकचंद वरकडे या कामगारांनी सलग १३ वर्ष काम केले असता कोणतीही पूर्व सुचना न देता बेकायदेशिर रित्या कामावरून कमी केल्याने बेरोजगार कामगारांस रोजगार देण्यात यावा. व वैगेन टिप्लर येथील कामगार BOBRN अनलोडींग काम करीत आहेत त्या कामगारांना अनलोडींगचे वेतन देण्यात यावे.

१६) फीड बैंक पावर O&M कंपनीचे कार्यरत कामगारांना १९४२ अनव्ये साप्ताहीक सुट्टी देण्यात यावी व राष्ट्रीय सणाच्या दिवशी कार्य करणाऱ्या कामगारांना अतिरिक्त कामाचा दुपट्टीने पगार देण्यात यावा.

१७) मॅकनली भारत इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड येथील कामगारांचा पि. एफ. नियमानुसार कर्मचारी भविष्य निधी कार्यालयात जमा करण्यात यावा.

१८) राधेश्याम सेवकराम राहांगडाले कंपनीचे कार्यरत कामगारांचा पी. एफ. मागील ३ वर्षापासुन पि.एफ. खात्यात जमा न केल्याने सदर कंत्राटदाराचे देयक, नियमानुसार स्थगीत करुन कामगारांचे पि. एफ. खात्यात त्वरीत पीएफ जमा करण्यात यावा.

१९) राहुल इंटरप्राईजेस कंपनीचे कार्यरत कामगारांचा ४ महिन्याचा पी. एफ., पि.एफ. खात्यात जमा करण्यात यावा.

२०) कामगारावर अन्याय करणार्या व मानसीक त्रास देणार्या कंत्राटदाराची योग्य ती चौकशी करुन सदरील कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्यात याव्या.
गोरगरीब कामगारांच्या अ.क्र. ०१ ते १९ ज्वलंत व कायदेशिर मागण्या दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सोडविण्यात याव्या.

आंदोलन हे लोकशाही मार्गाने होत असुन आंदोलना दरम्यान विज केंद्राचे काही अपरिमीत नुकसान झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी कंत्राटदार, शासन प्रशासना राहील याची नोंद घ्या. कामगारांना न्याय द्या, त्यांच्या मागण्या मान्य करा, असेही यावेळी तिरोडा येथे भंडारा, गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी तिरोडा येथे सांगितले.
यावेळी भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे,
माजी आ.श्री.चरणजी वाघमारे,
सौ.विद्याताई टेंभरे सरपंच खैरबोडी,
श्री.ओमजी पटले,
श्री. सौरभजी चव्हाण,
श्री. वाय टी कटरे,
डॉ. निर्मोदजी पटले,
श्री. राजुजी ठाकरे सरपंच भिवापुर,
सौ. पद्माताई कंगाले सरपंच गुमाधावडा,
श्री. संजयजी बूधे सरपंच गांगल,
श्री. सुभाषजी वढीचार सरपंच सिल्ली,
श्री.विनोदजी कास्मे,
श्री. निवेशजी गडपायले,
रोजंदारी मजदुर सेना तिरोडा येथील संघटन, उपोषण कर्ते, परिसरातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

TUSHAR PASHINE PRESS I CARD
TUSHAR I CARD PRESS AHILYARAJ
loader-image
BHANDARA GONDIA
1:31 pm, Apr 16, 2025
temperature icon 39°C
clear sky
Humidity 12 %
Pressure 1006 mb
Wind 15 Km/h
Wind Gust Wind Gust: 15 Km/h
Clouds Clouds: 0%
Visibility Visibility: 10 km
Sunrise Sunrise: 6:11 am
Sunset Sunset: 6:47 pm

Our Visitor

5 3 6 1 3 9
Total Users : 536139
Total views : 561327