
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर (भंडारा) – शहरातील हनुमान नगर परिसरात सुरू असलेल्या सट्टा मटक्याच्या मुख्य खायवालाच्या अड्ड्यावर शुक्रवारी (दि. १८ एप्रिल) सायंकाळी पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध सट्टा रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सहा जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून १,१४,५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, तुमसर शहर व तालुक्यात सट्टा मटक्याचे व्यवहार अनेक पातळ्यांवर विभागले गेले आहेत. परिसरातील विविध भागांमध्ये लपूनछपून काम करणारे लहान स्तरावरील सट्टा पट्टीवाले नागरिकांकडून आकडे लिहून घेतात, आणि हे सर्व आकडे मुख्य खायवालाच्या अड्ड्यावर सुपूर्त केले जातात. अशाच एका मुख्य सट्टा अड्ड्यावर ही कारवाई झाली आहे, त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी ४.३० ते ६.३० वाजेदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई पार पडली. गोपाल बारई यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून सट्टा मटका चा व्यवहार सुरू असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून छापा टाकला.
यात योगेन्द्र देवीदास येळणे (३७, राजेन्द्र नगर),अनिल ताराचंद हेडाऊ (४८, सरदार वार्ड)निलेश शिवकुमार साठवणे (३२, गांधी वार्ड)विजय गंगाधर रामटेके (४५, गांधी वार्ड)राजेश डोमाजी मदनकर (४९, हणुमान नगर)संजय हंसराज साठवणे (३२, गोवर्धन नगर)हे सर्व आरोपी तुमसर शहरातील रहिवासी असून सट्टा आकडे लिहून त्यावर जुगाराचे आकड्यचा हिशोब करत असताना प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.या आरोपिकडून विविध कंपन्यांचे मोबाईल (वनप्लस, रियल मी, विवो, रेडमी, सॅमसंग)
कॅनन कंपनीचा प्रिंटर दोन कॅल्क्युलेटर,सट्टा आकडे लिहिलेले कागद,हिशोब रजिस्टर,रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक विजय पंचबुधे, एएसआय गौतम, हेडकॉन्स्टेबल भोंडेकर, रवी आडे, उमेश सार्वे यांनी केली.
पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुधे म्हणाले,
“शहरात अवैध सट्टा मटक्याविरुद्ध पोलिसांचे अभियान सुरू असून अशा अड्ड्यांची माहिती मिळताच कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी सहकार्य करावे.” या कारवाईमुळे तुमसर तालुक्यात कार्यरत असलेल्या सट्टा माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाच्या तत्परतेबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.





Total Users : 883245
Total views : 6488719
