
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर : तुमसरमधील गोपीकिशन अग्रवाल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजने यंदाच्या बोर्ड परीक्षेत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत ८७.१२% चा सरासरी निकाल नोंदवला. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या यशात मोलाचा वाटा उचलला. बारावीच्या संगणक विज्ञान विभागात माही संजय पारधी हिने तब्बल ९०.८३% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ प्रियांशु डार्विन बोरकर याने ८५.५०% गुणांसह द्वितीय तर प्रार्थना विनोद मलेवार हिने ८०.१७% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
वाणिज्य शाखेतही विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली. आफरीन नाझ शाकीर हुसेन सिद्दीकी हिने ८४.५०% गुण मिळवत विभागात पहिला क्रमांक पटकावला. प्राची दीपक बंदाटे हिने ७३.५०% गुणांसह दुसरा आणि नाजनीन अहसान शेख हिने ७०% गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. कला शाखेतील विद्यार्थ्यांनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली. तुलसी विनोद नामदेव हिने ७०.६७%, सुकेशनी निकोलस बड हिने ६५.३३% आणि पुष्पा राजेश गुरिया हिने ६१.६७% गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
या घवघवीत यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर केवट यांनी सांगितले. हिंदी शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश कुमार अग्रवाल, उपाध्यक्ष प्रकाश कुमार अग्रवाल आणि शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक गुणवत्तेची नवी उंची गाठणाऱ्या गोपीकिशन अग्रवाल शाळेचे हे यश खरंच कौतुकास्पद आहे.





Total Users : 883240
Total views : 6488713
