
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
(1) नगरपरिषद तुमसर द्वारे शहरातील सर्व मालमत्ता धारकांचे मालमत्ता कर चारपट वाढविण्यात ते कर कमी करण्यात यावे.
(2)तुमसर शहरात काही वर्षा पासून नळ पाईप योजनेचे काम सुरु आहे पन ते काम फार संथ गतीने सुरु आहे ते काम जलद गतीने पूर्ण करुण पाईप लाईन च्या कामामुळे खुप ठीक ठिकाणी रस्ते खोदुन ठेवले आहेत ते दुरुस्त करण्यात यावे.
(3) तुमसर शहरातील संपूर्ण प्रभागातील नाली सफाई चे काम पावसाळा सुरु होण्या पूर्वी तातडीने करण्यात यावे जेणेकरून पावसाळ्यात शहरात पुर परिस्थिति निर्माण व्हायला नको.
(4) शहरात सफाई च्या अभावामुळे डासांची समस्या निर्माण झाली आहे त्यावर उपाय योजना करून नियमित फॉगिंग मशीन ने धूर फवारणी व नाल्यांन मधे औषध फवारणी करण्यात यावी.
(5) शहरातील मुख्य रस्त्यावर वरचे पडलेले खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.
(6)शहरातील बोरवेल,तसेच प्रभागातील बंद असलेले पथदिवे तत्काळ दुरुस्त करण्यात यावे.
(7)शहरातील गांधी सागर उद्यान चे काम करून नागरिकांन करिता लवकरात लवकर सुरू करण्यात यावे .
वरील या सर्व विषया बद्दल निवेदन देण्यात आले व सर्व समस्या काळजीपूर्वक लक्ष देऊन मार्गी लावण्यात यावे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने वरील सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद च्या विरोधात जनआंदोलन करेल अशी चेतावणी देण्यात आली या वेळी मुख्याधिकारी यांनी सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सबंधीत विभाग प्रमुखांना सूचना दिल्या निवेदन देते वेळी तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष इंजी.प्रदीपजी पडोळे,माजी खासदार श्री.मधुकरजी कुकडे,माजी
नप उपाध्यक्ष सौ.गिताताई कोंडेवार,जिल्हा महामंत्री सौ.कुंदाताई वैद्य,तुमसर शहर अध्यक्ष अमरीश सानेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.कल्याणी भुरे,माजी नगरसेवक आशीष कुकडे,रजनीश लांजेवार, सचिन बोपचे,राजू गायधने,सौ.अर्चना भुरे,सौ.शोभा लांजेवार,पवन पाटिल,शैलेश मेश्राम,नितीन धांडे,अन्नू रोचवानी,अनुज मलेवार,कृष्णा पाटिल,ललित शुक्ला, डॉ.चंद्रशेखर भोयर, निशीथ वर्मा,सतीश त्रिभुवनकर, निकेश पशीने,मोहन वैद्य,गणेश वंजारी,सौ.मनीषा उपाध्याय, सौ ममता गजभिये, सौ.ज्योति मिश्रा यांच्या सह भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते





Total Users : 883108
Total views : 6488546
